Join us  

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर शतकी खेळी करणारे भारतीय

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावण्याचा मान पहिले भारतीय म्हणून विनु मंकड यांनी पटकावला.

By आकाश नेवे | Published: August 09, 2018 9:26 AM

Open in App

भारतविरूद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शतक झळकावून अनेक दिग्गज विक्रमवीर फलंदाजांना मागे टाकणार का, यावर चर्चा होतेय.  लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावण्याचा मान पहिले भारतीय म्हणून विनु मंकड यांनी पटकावला. त्यांनी १९ जून १९५२ रोजी झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक (७२ धावा) तर दुस-या डावात १८४ धावा फटकावल्या होत्या. 

आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजांना लॉर्ड्सवर कसोटीमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तरीही भारताला या सामन्यात ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता.  भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही २६ जुलै १९९० रोजी सुरू झालेल्या कसोटीत शतक झळकावले होते. या सामन्यातच भारताचा त्यावेळचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही शतक झळकावले. एकाच सामन्यात दोन भारतीय फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ होती. त्या आधी १९७९ च्या मालिकेत एकाच सामन्यात दिलीप वेंगसरकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांनी शतके केली होती. 

भारतीय फलंदाजांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर दिलीप वेंगसकर यांनी 3 शतके झळकावता आली आहेत. अष्टपैलु अजित आगरकर यानेही २००२ च्या मालिकेत दुसºया डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतक झळकावले. मात्र त्याही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. 

सध्याच्या संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने २०१४ च्या मालिकेतील सामन्यात लॉर्ड्सवर शतक झळकावले होते. हा सामना जिंकण्यात भारताला यश आले होते. मात्र त्यानंतरच्या सलग तिन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

फलंदाज             धावा  कसोटी सुरु झाल्याची तारीखविनु मंकड            १८४   १९ जुन १९५२दिलीप वेंगसरकर १०३    २ आॅगस्ट १९७९गुंडाप्पा विश्वनाथ   ११३    २ आॅगस्ट १९७९दिलीप वेंगसरकर ११३    १० जून १९८२दिलीप वेंगसरकर 126    5 जून 1986रवि शास्त्री           १००    २६ जुलै १९९०मो. अझरुद्दीन      १२१    २६ जुलै १९९०अजित आगरकर १०९     २५ जुलै २००२राहूल द्रविड        १०३     २१ जुलै २००२अजिंक्य रहाणे     १०३     १७ जुलै २०१४

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा