Join us  

अंकितच्या खेळीने भारत अ संघाची पकड मजबूत, न्यूझीलंडच्या दुसºया डावात १ बाद १०४ धावा

महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याच्या नाबाद १६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारत अ संघाने सोमवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुस-या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:48 AM

Open in App

विजयवाडा : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याच्या नाबाद १६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारत अ संघाने सोमवारी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुस-या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंड अ संघाने दिवसअखेर १ बाद १०४ धावा केल्या.जीत रावल ४१, तर कर्णधार हेन्री निकोल्स ५५ धावांवर खेळत आहेत. या दोघांनी दुसºया गड्यासाठी नाबाद ८५ धावांची भागीदारी केली. आता न्यूझीलंड अ संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप १३२ धावांची गरज असून, त्यांचे ९ फलंदाज बाकी आहेत. भारत अ कडून शाहबाज नदीम याने २६ धावांत १ गडी बाद केला. त्याआधी अंकित बावणेच्या सुरेख खेळीमुळे भारत अ संघाला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिल्या डावात २३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात यश मिळवले. अंकित बावणे २४५ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार आणि ५ षटकार ठोकले आणि पार्थिव पटेल याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी १६६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारत अ संघाला पहिल्या डावात ४४७ धावापर्यंत मजल मारता आली.संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड अ : पहिला डाव २११ आणि दुसरा डाव १ बाद १०४.(हेन्री निकोल्स खेळत आहे ५५, जीत रावल खेळत आहे ४१).भारत अ : पहिला डाव : ११० षटकांत सर्व बाद ४४७. (अंकित बावणे नाबाद १६२, श्रेयस अय्यर ८२, पार्थिव पटेल ६५, ईश सोढी ३/१२०, मुन्रो २/२४).

टॅग्स :क्रिकेट