Join us  

ICC World Cup 2019 : सलग दुसऱ्या शतकासह केन विल्यमसनने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

विल्यमसनचे कारकिर्दीतील हे १३वे शतक ठरले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:16 PM

Open in App

साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विश्वचषकात सलग दुसरे शतक लगावत एक विश्वविक्रम रचला आहे. आज न्यूझीलंडचा सामना वेस्ट इंडिजबरोबर होत आहे. वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्यानंतर विल्यमसनने शतक झळकावले.

विल्यमसनचे कारकिर्दीतील हे १३वे शतक ठरले. विल्यमसनने १२४ चेंडूंत ९ चौकारांसह आपले हे शतक पूर्ण केले. विश्वचषकात न्यूझीलंडच्या कर्णधाराचे हे सातवे शतक आहे. यापूर्वी विश्वचषकात सर्वाधित शतके लगावण्याच्या विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. कारण ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांनी आतापर्यंत विश्वचषका सहा शतके लगावली होती. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे बरोबरीत होते. पण विल्यमसनच्या शतकानंतर न्यूझीलंडच्या नावावर हा विश्वविक्रम झाला आहे.

विश्वचषकामध्ये प्रत्येक देशाच्या कर्णधारांनी झळकावलेली शतके

न्यूजीलंड- 7 शतक

ऑस्ट्रेलिया - 6 शतक

भारत - 4 शतक

श्रीलंका - 3 शतक

वेस्ट इंडीज  - 2 शतक

इंग्लंड - 2 शतक

झिम्बाव्बे - 2 शतक

दक्षिण आफ्रिका  - 1 शतक

पाकिस्तान - 1 शतक

आयरलंड - 1 शतक

विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडली 'ही' गोष्ट, पहिल्याच चेंडूवर दोन आऊट झाला ओपनरवेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात एक गोष्ट अशी घडली की, यापूर्वी विश्वचषकात ती कधीही घडली नव्हती. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. पण हा सलामीवीर पहिल्याच चेंडूवर दोनदा आऊट झाल्याचे पाहायला मिळाले, नेमके घडले तरी काय ते जाणून घ्या...

वेस्ट इंडीजकडून पहिले षटक शेल्डन कॉट्रेल टाकले. आपल्या पहिल्याच चेंडूवर कॉट्रेलने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला बाद केले. ऑन साइडला फटका मारण्याच्या नादात गप्तिलच्या पॅडवर हा चेंडू आदळला. कॉट्रेलने यावेळी पंचांकडे जोरदार अपील केले. पंचांनीही हे अपील मान्य केले नाही आणि त्यांनी गप्तिलला आऊट दिले नाही. त्यानंतर कॉट्रेल आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी रीव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. 

तिसऱ्या पंचांनी हा चेंडू पुन्हा पाहिला. हा चेंडू स्टम्पच्या लाईनमध्येच पडला होता. त्याचबरोबर हा चेंडू स्टम्पलाही लागत होता. त्यामुळे पंचांनी गप्तिलला बाद दिले. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. पण त्यानंतर गप्तिल पहिल्याच चेंडूवर दुसऱ्यांदा आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट विश्वचषकात पहिल्यांदा पाहायला मिळाली.

न्यूझीलंडचा यापूर्वी सामना अफगाणिस्तानबरोबर झाला होता. या सामन्यातही गप्तिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. विश्वचषकात एक सलामीवीर सलग दोन्ही सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.