यजमान मुंबईकर बॅकफूटवर, बडोद्याकडे २०५ धावांची भक्कम आघाडी

पहिल्याच दिवशी मुंबईचा डाव १७१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर बडोद्याने दुस-या दिवसअखेर ४ बाद ३७६ धावांची मजल मारत २०५ धावांची भक्कम आघाडी मिळवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:24 AM2017-11-11T05:24:14+5:302017-11-11T05:24:45+5:30

whatsapp join usJoin us
The hosts have a strong lead of 205 runs on the back foot, on the backfoot | यजमान मुंबईकर बॅकफूटवर, बडोद्याकडे २०५ धावांची भक्कम आघाडी

यजमान मुंबईकर बॅकफूटवर, बडोद्याकडे २०५ धावांची भक्कम आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ऐतिहासिक ५००व्या रणजी सामन्यात पूर्णपणे दबावाखाली गेलेल्या मुंबईकरांवर बडोदा संघाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईचा डाव १७१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर बडोद्याने दुस-या दिवसअखेर ४ बाद ३७६ धावांची मजल मारत २०५ धावांची भक्कम आघाडी मिळवली.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी यजमान मुंबईला १७१ धावांत गुंडाळल्यानंतर बडोद्याने सावध परंतु भक्कम सुरुवात केली. त्याचवेळी, पहिल्या डावात मोठी आघाडी घेताना बडोद्याने आपले तीन गुणही निश्चित केले. पहिल्या दिवशी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत आदित्य वाघमोडेने ३०९ चेंडूंमध्ये १२ चौकार व एका षटकारासह शानदार १३८ धावांची खेळी केली. विष्णू सोळंकी (५४), दीपक हूडा (७५) आणि स्वप्नील सिंग (नाबाद ६३) यांनीही शानदार अर्धशतकी खेळी करुन मुंबईला बॅकफूटला आणले. दुसºया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा स्वप्नील आणि अभिजीत करंबेळकर (८*) खेळपट्टीवर टिकून होते.
१ बाद ६३ धावा अशी दुसºया दिवसाची सुरुवात करताना बडोद्याच्या सर्वच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वाघमोडेने दमदार शतकासह एक बाजू लढवताना दोन शतकी भागीदाºया केल्या. त्याने हुडासह १४०, तर स्वप्नीलसह १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करुन मुंबईकरांचा घाम फोडला.
दुसरीकडे, मुंबईकर गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागली. दिवसभरामध्ये केवळ ३ बळी घेण्यातच यजमानांना यश आले. पहिल्या दिवशी रॉयस्टन डायसने एक बळी घेतल्यानंतर दुसºया दिवशी शार्दुल ठाकूर, विजय गोहिल आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईसाठी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ५६.२ षटकात सर्वबाद १७१ धावा.
बडोदा (पहिला डाव) : ११५ षटकात ४ बाद ३७६ धावा (आदित्य वाघमोडे १३८, दीपक हुडा ७५, स्वप्नील सिंग खेळत आहे ६३, विष्णू सोळंकी ५४; रॉयस्टन डायस १/१६, श्रेयस अय्यर १/२२.)

Web Title: The hosts have a strong lead of 205 runs on the back foot, on the backfoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.