Join us  

मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव

साजरा केला ४५वा वाढदिवस : जुन्या आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:05 AM

Open in App

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मंगळवारी आपला ४५वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडिया आणि क्रीडा विश्वातून मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आजी-माजी खेळाडूंनी सचिनला त्याच्या वाढदिनी शुभेच्छा दिल्या.सचिनसोबत अनेक वर्षे ड्रेसिंगरूम शेअर करणाऱ्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने आपल्या संदेशात म्हटले आहे, की सचिन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमीच आमचा प्रेरणास्रोत राहिला आहेस. निवृत्तीनंतरही तुझे क्रिकेटमधील योगदान अलौकिक आहे. तुझ्या भावी आयुष्याला शुभेच्छा. तर एकदिवसीय सामन्यात सचिनसोबत डावाची सुरुवात करणाºया वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या ‘हटके’ अंदाजात मास्टरला शुभेच्छा दिल्या. आज अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे, जो काळालासुद्धा रोखू शकत होता. क्रिकेट बॅटला सर्वांत मोठे हत्यार बनवल्याबद्दल धन्यवाद. ज्याचा वापर करून माझ्यासारखे अनेक फलंदाज घडले. वाढदिनाच्या शुभेच्छा. रैनाने म्हटले की, संपूर्ण भारतीयांना एकजूट करून त्यांच्या चेहºयावर हसू फुलवणाºया, त्यांचे स्वप्न सत्यात उतरवणाºया सचिनला शुभेच्छा. सचिन एक भावना असून तो असाधारण आहे. लोकेश राहुलने म्हटले की, क्रिकेटच्या देवाला शुभेच्छा... पाजी तुम्ही नेहमीच मला प्रेरित करता. आपल्याला वाढदिनाच्या शुभेच्छा. युवराज, हरभजन सिंग यांनीसुद्धा सोशल मीडियावरून सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.‘कारवरील ओरखडाही संस्मरणीय’मुंबई : कारवरील ओरखडा हा त्या मालकासाठी आनंद देणारा कधीच नसतो; पण महान फलंदाज सचिन तेंडुलकरला आपल्या कारवरील‘तो’ ओरखडा आनंद देणारा आहे. हा ओरखडा आपल्यासाठी संस्मरणीय खूण असल्याचे त्याने म्हटले आहे. २०११ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना त्याच्या कारवर ओरखडे पडले होते.‘लेग स्पिन टाकणारा आॅफ स्पिनरहा बहुभाषिकाप्रमाणे’मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फिरकीपटूंचा वाढता दबदबा पाहाता महान फलंदाज सचिन तेंडुलकरने लेग स्पिन गोलंदाजी करणारा आॅफ स्पिनर हा बहुभाषिक असणाºया व्यक्तीप्रमाणे असतो, असे म्हटले. सचिनने कुणाचेही नाव घेतले नाही; पण त्याचा इशारा हा रविचंद्रन अश्विनकडे जातो. जो राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी मनगटाच्या साह्याने स्पिन करणाचा प्रयत्न करीत आहे. सचिनने आपल्या वाढदिवशी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला की, हे अशा प्रकारे आहे ज्याप्रमाणे तुम्हाला दोन ते तीन वेगवेगळ्या भाषा अवगत असतात. आता पाच किंवा सहा भाषा समजावून घेण्यात काहीही अडचण नाही. यातून तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. हे विविधता शोधण्यासारखे आहे. असे म्हणने चुकीचे ठरेल की ‘तो’ लेग स्पिन गोलंदाजी करून मालिकेत सामील होत आहे.

टॅग्स :आयपीएल 2018