Join us  

हनुमा, अंकितने भारत ‘अ’ संघाला सावरले

झुंजार खेळीच्या जोरावर भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३२२ धावा केल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:08 AM

Open in App

बंगळुरू : सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना हनुमा विहारीचे नाबाद शतक व अंकित बावणेची ८० धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३२२ धावा केल्या.भारत अ संघाकडून हनुमा विहारी याने २७३ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद १३८ धावा केल्या, तर त्याला साथ देणाºया शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने १४६ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ८० धावांची खेळी सजवली. कर्णधार श्रेयस अय्यरने ७२ चेंडूंत ६ चौकारांसह ३९ धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. श्रीकर भरत ५१ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावांवर खेळत आहे.>संक्षिप्त धावफलकभारत अ (पहिला डाव) : ९० षटकांत ४ बाद ३२२. (हनुमा विहारी खेळत आहे १३८, अंकित बावणे ८०, श्रेयस अय्यर ३९, श्रीकर भरत खेळत आहे ३०. डॅन पी. १/४६, एस. मुथुसमी १/५१.)