Join us  

‘भारताकडे ऑस्ट्रेलियाला नमविण्याची मोठी संधी’

कोरोनामुळे सीएला आर्थिक फटका बसला. नुकसानभरपाईसाठी भारताविरुद्ध मालिका यजमानांसाठी  महत्त्वपूर्ण आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 1:55 AM

Open in App

कराची : आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा पराभूत करण्याची भारताकडे उत्कृष्ट संधी असल्याचे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने व्यक्त केले. यजमान संघ गोलंदाजांना पूर्णपणे पूरक ठरतील, अशा खेळपट्ट्या तयार करणार नाही, अशी अपेक्षा रमीझने व्यक्त केली.

कसोटी मालिकेला १७ डिसेंबर रोजी ॲडिलेड येथे दिवस-रात्र सामन्याद्वारे सुरुवात होणार आहे. ‘गेल्या काही वर्षांआधी आम्ही अनुभवल्या तशा खेळपट्ट्या आता ऑस्ट्रेलियात दिसणार नाहीत. खेळपट्टीवर उसळी कमी असून चेंडू चांगलेच वळण घेतात. गोलंदाजांना हवा तसा लाभ मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांची संख्या राहणार नसल्याने कसोटी सामने पाच दिवस चालावेत, अशी सीएची अपेक्षा आहे. त्यादूष्टीने खेळपट्ट्या तयार करण्यात येत आहेत.’ 

कोरोनामुळे सीएला आर्थिक फटका बसला. नुकसानभरपाईसाठी भारताविरुद्ध मालिका यजमानांसाठी  महत्त्वपूर्ण आहे. मैदानावर प्रेक्षकांची संख्या नगण्य असेल. त्यामुळे टीव्ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होईल, याची खबरदारी सीए घेणारच आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया