Join us  

गावसकर घेणार सरकारचा सल्ला

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानला जायचे किंवा नाही, याबाबत सुनील गावसकर सरकारचा सल्ला घेणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:16 AM

Open in App

नवी दिल्ली : इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानला जायचे किंवा नाही, याबाबत सुनील गावसकर सरकारचा सल्ला घेणार आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केले. गावसकर यांना इम्रान यांच्या कार्यालयाकडून अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. गावसकर यांच्याप्रमाणेच भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गावसकर म्हणाले की, ‘मी सरकारची मंजुरी घेणार आहे. भलेही माझ्याकडे वेळ असेल. तरीही मला वाटते की, हा दौरा करण्याआधी मी सरकारचे मत जाणून घेईल.’