इंदूर : बांगलादेश दौ-यातील अपयशापाठोपाठ भारत दौºयातील पहिल्या दोन सामन्यात फिरकीपुढे नतमस्तक होणाºया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आघाडीच्या फलंदाजांनी झकास सुरुवात केल्यास नंतर फिरकीला तोंड देणे कठीण जाणार नाही, असे म्हटले आहे.
चहल आणि कुलदीप यांनी पाहुण्या संघाच्या फलंदाजांना त्रस्त करून सोडले. होळकर स्टेडियमवर तिसºया वन-डेआधी पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला, ‘फिरकीला समजून घेणे आणि काळजीपूर्वक खेळणे कठीण नाही. तथापि सुरुवातीपासून पडझड झाल्यास फिरकी मारा समजून घेणे कठीण होते.’ वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेल हे आयपीएल खेळत असल्याने त्यांना येथे फारसे कठीण जाणवू नये. तथापि तांत्रिकरीत्या हे तिन्ही फलंदाज वेगवान खेळपट्ट्यांवरच अधिक खेळतात. त्यामुळे ताळमेळ साधणे कठीण जात आहे. तरीही आमच्यापैकी कुणी बहाणा करणार नाही, अशी आशा वॉर्नरने व्यक्त केली. परिस्थिती कशी आहे हे ओळखून खेळावे लागेल. पहिल्या दोन सामन्यात आमच्या संघाची कामगिरी लौकिकास्पद नव्हती. आम्हाला हवा तसा खेळ करता आला नाही. सलामीवीर या नात्याने सुरुवातीपासून वर्चस्व मिळविणे कठीण जात आहे. मागील एक वर्षांपासून आमची फलंदाजी माघारली आहे. अशातच भारताला भारतात पराभूत करण्याचे अवघड आव्हान संघापुढे आहे. सध्याच्या संघात नव्या चेहºयांचा भरणा असल्याने त्यांना प्रोत्साहन देऊन विजय मिळविणे हे अवघड काम असल्याचे वॉॅर्नरचे मत आहे. (वृत्तसंस्था)