Join us  

विश्वचषक स्पर्धा सुरक्षा व्यवस्थेची माहिती भारताला देणार

आयसीसीची बुधवारी बैठक : पाकवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता धुसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 6:32 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारी येथे होणाऱ्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीदरम्यान आगामी विश्वचषक स्पर्धेतील सुरक्षेबाबत भारताच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तानवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफ चे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध १६ जून रोजी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या मागणीचा विचार करीत भारतीय क्रिकेटचे संचालन करणाºया प्रशासकांच्या समितीने (सीओए) आयसीसीला पत्र लिहित पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करता दहशतवादाला खतपाणी घालणाºया देशांवर बहिष्कार टाकण्याची विनंती केली आहे.

आयसीसीची तिमाही बैठक बुधवारी दुबईमध्ये मुख्य कार्यकारिणीच्या (सीईसी) बैठकीसह प्रारंभ होत आहे. यात बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्या पत्रावर चर्चा होईल. बीसीसीआयने इंग्लंडमध्ये ३० मेपासून प्रारंभ होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान आपले खेळाडू व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आयसीसीच्या कार्याची कल्पना असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत विस्तृत माहिती देईल. सर्व सहभागी देशांसाठी ही व्यवस्था समान राहील. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी नेहमीच उच्च पातळीवरील व्यवस्था करण्यात येते, पण शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे त्याचे निरसन करण्यात येईल.’

त्याचवेळी सध्या सर्वात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याविषयी आयसीसीकडून चर्चा होण्याची शक्यता नाही. कारण हा पर्याय नाही. आयसीसीच्या अनेक बैठकीमध्ये आपली उपस्थितीती दर्शविलेल्या या झाले अधिकाºयाने सांगितले, ‘आयसीसी कुठल्या देशाला अन्य सदस्य देशांसोबत संबंध तोडण्यास सांगण्याच्या स्थितीत नाही. हे पाऊल उचलणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणावर सरकारी पातळीवर तोडगा काढायला हवा.’ (वृत्तसंस्था)पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याच्या मुद्यावर माजी क्रिकेटपटूंचे एकमत नाही. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली व सीनिअर आॅफ स्पिनर हरभजन सिंग यांच्या मते १६ जूनची लढत रद्द करायला हवी, पण जर उभय संघांची गाठ उपांत्य किंवा अंतिम फेरीत पडली तर काय करायचे, याबाबत मात्र त्यांनी कुठले मत व्यक्त केलेले नाही. दुसरीकडे सुनील गावस्कर व सचिन तेंडुलकर यांच्या मते भारताने पाकिस्तानला पराभूत करायला हवे कारण वॉकओव्हर देण्याचा अर्थ परंपरागत प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण बहाल करणे असा होईल. कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र सरकाराचा जो निर्णय राहील त्याचे संघ पालन करेल, असे म्हटले आहे.