Join us  

चौथी कसोटी ; यजमान दक्षिण आफ्रिकेची भक्कम आघाडी

चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झुंजार खेळ करत आॅस्टेÑलियाने पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला. परंतु, यानंतरही यजमान दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर ४०१ धावांची भक्कम आघाडी घेत सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमानांनी ३ बाद १३४ धावा अशी मजल मारली होती. यामुळे कांगारु आता प्रचंड दबावाखाली असून त्यांचा मालिका पराभव जवळपास निश्चित झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 2:09 AM

Open in App

जोहान्सबर्ग  - चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झुंजार खेळ करत आॅस्टेÑलियाने पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला. परंतु, यानंतरही यजमान दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर ४०१ धावांची भक्कम आघाडी घेत सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमानांनी ३ बाद १३४ धावा अशी मजल मारली होती. यामुळे कांगारु आता प्रचंड दबावाखाली असून त्यांचा मालिका पराभव जवळपास निश्चित झाला आहे.पाहुण्या आॅस्टेÑलियाचा पहिला डाव केवळ २२१ धावांत गुंडाळून यजमानांनी तब्बल २६७ धावांची मोठी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली. विशेष म्हणजे यानंतरही दक्षिण आफ्रिकेने कांगारुंवर फॉलोआॅन न देता दुसºया डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जखमी कर्णधार टिम पेन याने झुंजार खेळी केल्यानंतरही आॅस्टेÑलियाला भलीमोठी पिछाडी टाळता आली नाही. तो आॅस्टेÑलियाचा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. पेनने ९६ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. तसेच त्याने पॅट कमिन्ससह (५०) सातव्या गड्यासाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारीही केली.सकाळी गोलंदाजीस पोषक वातावरण असतानाही पेन आणि कमिन्स यांनी आॅसी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ६ बाद ११० धावा अशा प्रतिकूल परिस्थितीतून या दोघांनी संघाला सावरले. कमिन्सने ९२ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. केशव महाराजने (३/९२) त्याला बाद केले. विश्रांतीनंतर मात्र, आॅसीचा डाव गडगडला. त्यांनी ५ षटकात २० धावांमध्ये आपले अखेरचे ३ बळी गमावले. कागिसो रबाडा (३/५३) आणि वर्नोन फिलँडर (३/३०) यांनीही अचूक मारा केला.यानंतर दुसºया डावात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली.एडेन मार्करम (३७), डीन एल्गर (३९*) यांनी संघाला ५४ धावांची सलामी दिली. पॅट कमिन्सने मार्करमला बाद करुन ही जोडी फोडल्यानंतर हाशिम आमला (१६) आणि एबी डिव्हिलियर्स (६) हे झटपट परतले. मात्र, कर्णधार फाफ डूप्लेसिसने (३४*) एल्गरला चांगली चांगली साथ देत दिवसखेरपर्यंत टिकून राहत संघाची पडझड रोखली. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या कमिन्सने ३५ धावांत २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकदक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १३६.५ षटकात सर्वबाद ४८८ धावा.आॅस्टेÑलिया (पहिला डाव) : ७० षटकात सर्वबाद २२१ धावा (टिम पेन ६२, उस्मान ख्वाजा ५३, पॅट कमिन्स ५०; वर्नोन फिलंडर ३/३०, कागिसो रबाडा ३/५३, केशव महाराज ३/९२).दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ५६ षटकात ३ बाद १३४ धावा (डीन एल्गर खेळत आहे ३९, एडन मार्करम ३७, फाफ डूप्लेसिस खेळत आहे ३४; पॅट कमिन्स २/३५.)

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिका