पहिली कसोटी: श्रीलंकेचे पारडे वरचढ; थिरिमाने, मॅथ्यूजची अर्धशतके, भारत सर्व बाद १७२

लाहिरू थिरिमाने व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना तिस-या विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसºया दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद १६५ धावांची मजल मारत वर्चस्व राखले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 02:36 IST2017-11-19T02:36:32+5:302017-11-19T02:36:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
First Test: Sri Lanka's Parade; Thirimanne, Matthews half centuries, India all-round 172 | पहिली कसोटी: श्रीलंकेचे पारडे वरचढ; थिरिमाने, मॅथ्यूजची अर्धशतके, भारत सर्व बाद १७२

पहिली कसोटी: श्रीलंकेचे पारडे वरचढ; थिरिमाने, मॅथ्यूजची अर्धशतके, भारत सर्व बाद १७२

कोलकाता : लाहिरू थिरिमाने व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना तिसºया विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसºया दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद १६५ धावांची मजल मारत वर्चस्व राखले.
वर्षभरापेक्षा अधिक कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाºया थिरिमानेने वैयक्तिक २७ धावांवर शिखर धवनतर्फे मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत ५१ धावांची खेळी केली आणि मॅथ्यूजसोबत (५२) तिसºया विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. या दोघांनी प्रत्येकी ९४ चेंडू खेळताना प्रत्येकी ८ चौकार लगावले. अंधूक प्रकाशामुळे आज तिसºया दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबविण्यात आला त्या वेळी निरोशन डिकवेला (१४) व कर्णधार दिनेश चांदीमल (१३) खेळपट्टीवर होते. भुवनेश्वर कुमार (२-४९) व उमेश यादव (२-५०) यांनी भारताला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला, पण तरी श्रीलंकेला मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले.
त्याआधी, सकाळच्या सत्रात श्रीलंकेने सुरंगा लकमलच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत भारताला १७२ धावांत गुंडाळले. श्रीलंका संघ पहिल्या डावात केवळ ७ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या सहा विकेट शिल्लक आहेत.
पहिले दोन दिवस खराब वातावरणामुळे केवळ ३२.२ षटकांचा खेळ शक्यझाला, पण आज सूर्यप्रकाश असल्यामुळे ७२.२ षटके टाकल्या गेली. भुवनेश्वरने दिमुथ करुणारत्ने (८) व सदिरा समरविक्रम (२३) यांना माघारी परतवले, तर उमेशने अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (५२) व लाहिरू थिरिमाने (५१) यांना तंबूचा मार्ग दाखवला.
त्याआधी, तळाच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे भारताला १७२ धावांपर्यंत मजल
मारता आली. भारताच्या डावात चेतेश्वर पुजाराने (५२) अर्धशतकी खेळी केली. रिद्धिमान साह (२९),
रवींद्र जडेजा (२२), भुवनेश्वर कुमार (१३), मोहम्मद शमी (२३) व उमेश यादव (नाबाद ६) यांनी त्याला सहकार्य केले. श्रीलंकेतर्फे लकमलने चार, तर परेरा, गमागे व शनाका यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)

गोलंदाजांचे आक्रमण अव्वल दर्जाचे : मॅथ्यूज
कोलकाता : मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांचा समावेश असलेले भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण अव्वल दर्जाचे असून फलंदाजांना त्यांच्याविरुद्ध नेहमी सावध असावे लागते, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने व्यक्त केली. मॅथ्यूज म्हणाला,‘विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा उदय झाला आहे. हे तिन्ही (शमी, भुवनेश्वर आणि उमेश) उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत.

धावफलक

भारत पहिला डाव :- लोकेश राहुल झे. डिकवेला गो. लकमल ००, शिखर धवन त्रि. गो. लकमल ०८, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. गमागे ५२, विराट कोहली पायचित गो. लकमल ००, अजिंक्य रहाणे झे. डिकवेला गो. शनाका ०४, रविचंद्रन अश्विन झे. करुणारत्ने गो. शनाका ०४, रिद्धिमान साहा झे. मॅथ्यूज गो. परेरा २९, रवींद्र जडेजा पायचित गो. परेरा २२, भुवनेश्वर कुमार झे. डिकवेला गो. लकमल १३, मोहम्मद शमी झे. शनाका गो. गमागे २४, उमेश यादव नाबाद ०६. अवांतर (१०).एकूण ५९.३ षटकांत सर्वबाद १७२. बाद क्रम : १-०, २-१३, ३-१७, ४-३०, ५-५०, ६-७९, ७-१२७, ८-१२८, ९-१४६, १०-१७२. गोलंदाजी : लकमल १९-१२-२६-४, गमागे १७.३-५-५९-२, शनाका १२-४-३६-२, करुणारत्ने २-०-१७-०, हेराथ २-०-५-०, परेरा ७-१-१९-२.
श्रीलंका पहिला डाव :- सदिरा समरविक्रम झे. साहा गो. भुवनेश्वर २३, दिमुथ करुणारत्ने पायचित गो. भुवनेश्वर ०८, लाहिरू थिरिमाने झे. कोहली गो. यादव ५१, अँजेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव ५२, दिनेश चांदीमल खेळत आहे १३, निरोशन डिकवेला खेळत आहे १४. अवांतर (४). एकूण ४५.४ षटकांत ४ बाद १६५. बाद क्रम : १-२९, २-३४, ३-१३३, ४-१३८. गोलंदाजी : भुवनेश्वर १४.४-२-४९-२, मोहम्मद शमी १३.५-५-५३-०, उमेश यादव १३-१-५०-२, आर. अश्विन ४-०-९-०, रविंद्र जडेजा ०.१-०-०-०.

Web Title: First Test: Sri Lanka's Parade; Thirimanne, Matthews half centuries, India all-round 172

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.