भारताची गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी

भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेतली. मी असतो तरी हेच काम केले असते. पण ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:35 AM2019-07-11T05:35:14+5:302019-07-11T05:35:24+5:30

whatsapp join usJoin us
Expected performance in bowling India | भारताची गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी

भारताची गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेतली. मी असतो तरी हेच काम केले असते. पण नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यानंतर सावध पवित्रा घेण्याचे न्यूझीलंडचे धोरण समजले नाही. संथ खेळपट्टी पाहून न्यूझीलंडने लक्ष्य निश्चित केले असावे. भारतीय गोलंदाजांनी स्थितीचा चांगला लाभ घेतला. न्यूझीलंडच्या कर्णधारानेही विचार केला असावा की अशा दडपण असलेल्या बाद फेरीच्या सामन्यात २५०-२७० धावा आव्हानात्मक ठरू शकतात.


न्यूझीलंडने सावध खेळून धावफलक हलता ठेवला. सुरुवातीला मला देखील वाटले की न्यूझीलंड घाबरला असावा, पण संपूर्ण स्पर्धेवर नजर टाकल्यास कळून चुकेल की हा संघ किती चतुर आहे. या संघाने क्षमता आणि कौशल्याची झलक दाखवली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान पटकविण्याचा हा संघ खरा दावेदार होता.
दुसºया उपांत्य सामन्यात इंग्लंडची गाठ आॅस्ट्रेलियाशी आहे. माझ्यामते बर्मिंगहॅममध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध होन हात करण्यास इंग्लंड आनंदी असेल. साखळीत हा संघ मिशेल स्टर्क आणि बेहरेनडोर्फ यांच्या माºयापुढे चाचपडला होता. इंग्लंड पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. द. आफ्रिकेकडून पराभव पत्करणाºया आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मोठ्या धावा करायला हव्या, याची जाणीव आहेच. दडपणात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे ही इंग्लंडची या स्पर्धेत सर्वांत कमकुवत बाजूूूूूूूूूूूू ठरली.


त्याचवेळी गोलंदाजीत विविधतेची उणीव असल्याबद्दल आॅस्ट्रेलिया चिंतेत असावा. खेळपट्टीची स्थिती पाहून नाथन लियोनला खेळविण्याचा विचार करावा. मी सुरुवातीलाच सांगितले की खेळपट्टी संथ असेल आणि फिरकीला अनुकूल असेल, तर आॅस्ट्रेलियाला आव्हान मिळू शकेल. मी आजही या गोष्टीवर कायम आहे.


संघात पीटर हॅन्डस्कोम्बाचा समावेश करणे आॅस्टेÑलियाचे उत्तम पाऊल आहे. तो फिरकीला चांगला खेळतो. आॅस्ट्रेलियाच्या भारत दौºयात त्याने शतक ठोकले होते. इंग्लंडला त्यांच्या घरी धूळ चारणे कठीण आहे, पण आॅस्ट्रेलियाने याआधीही हे केले आहे. दुसरीकडे इंग्लंडला विश्वचषक जिंकायचा झाल्यास आॅस्ट्रेलियाला हरवावेच लागेल.

ग्रॅमी स्मिथ

Web Title: Expected performance in bowling India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.