Join us  

कर्णधारपदाचे महत्त्व सर्वांना कळले

आयपीएलमध्ये आपल्या कल्पनेतील सर्वंच काही आहे. खेळपट्टी वेगळी होती आणि परिस्थितीसुद्धा. अनेकदा धक्का देणारा कार्यक्रम तर मध्यंतरी अनेक दिवसांचा ब्रेक. बेंच स्ट्रेंग्थचे महत्त्व तर लिलावामध्ये हुशारी दाखविण्याचा परिणामही आपल्याला अनुभवायला मिळाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:22 AM

Open in App

- हर्षा भोगले आयपीएलमध्ये आपल्या कल्पनेतील सर्वंच काही आहे. खेळपट्टी वेगळी होती आणि परिस्थितीसुद्धा. अनेकदा धक्का देणारा कार्यक्रम तर मध्यंतरी अनेक दिवसांचा ब्रेक. बेंच स्ट्रेंग्थचे महत्त्व तर लिलावामध्ये हुशारी दाखविण्याचा परिणामही आपल्याला अनुभवायला मिळाला.स्टार खेळाडूंच्या तुलनेत अनोळखी चेहऱ्यांनी छाप सोडली. फलंदाजांना अपेक्षेनुसार संधी मिळाल्या, पण चांगल्या गोलंदाजीने छाप सोडली. आयपीएलच्या या बाबींचा माझ्यावर प्रभाव पडला. पुन्हा एकदा चांगल्या नेतृत्वाचे महत्त्व सर्वांना कळले. दरम्यान,या कालावधीत प्रशिक्षकांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे, पण कर्णधार आताही निर्धाराने उभे असल्याचे बघून आनंद झाला.ज्या सीनिअर खेळाडूंच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत त्यांचे स्थान घेण्यासाठी युवा भारतीय खेळाडू सज्ज असल्याचे दिसून आले. एका एलिमिनेटरच्या लढतीत शुभमान गिल व शिवम मावी आपापल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र सुखावणारे होते. हा अनुभव तुम्हाला कुठल्याही किमतीमध्ये मिळणार नाही. ऋषभ पंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली. उमेश यादवने मुख्य गोलंदाज म्हणून ठसा उमटवला. दिनेश कार्तिक कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मचा आनंद घेत आहे. अंबाती रायुडूने आपल्या कामगिरीवर का नजर ठेवायची, हे दाखवून दिले. के. एल. राहुल नेहमीप्रमाणे शानदार भासला, तर एम. एस. धोनी आपल्या कारकिर्दीच्या या वळणावर खेळाचा आनंद घेताना दिसला.मला काही भारतीय अष्टपैलूंची कामगिरी बघणे आवडेल. कुठल्याही संघाचा समतोल साधण्यासाठी अष्टपैलू महत्त्वाचा ठरतो, पण भारतात असे अष्टपैलू फार नाहीत. मॅन आॅफ द टूर्नामेंट राशिद खान आहे. त्याच्या कामगिरीमुळे प्रतिभा प्रत्येक ठिकाणी असल्याचे सिद्ध होते.युद्ध प्रभावित क्षेत्रातही प्रतिभा असल्याची प्रचीती येते. अफगाणिस्तानचा एक खेळाडू आमच्या खेळात सर्वोच्च स्थानी असल्याचे चित्र बघणे शानदार आहे. (टीसीएम)

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटक्रीडा