अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अडचणीत आणल्यानंतरही भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला पहिला कसोटी सामना बरोबरीची लढत असल्याचे वाटते. या लढतीत प्रत्येक धाव महत्त्वाची असल्याचे अश्विन म्हणाला.
अश्विन दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला, ‘आम्ही त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले, असे मला वाटते. आम्ही दोन्ही टोकाकडून त्यांच्यावर दबाव आणला. आम्ही वेगवान गोलंदाजी व फिरकी मारा यांना वेगवेगळ्या पद्धतीने बघत नसून गोलंदाजी विभागाचा विचार करतो.’ अश्विन पुढे म्हणाला, ‘मी चहापानापूर्वी व त्यानंतर सलग २२ षटके गोलंदाजी केली. त्यांना अधिक धावा करता येणार नाही, याची खबरदारी घेतली. मी आतापर्यंत ही लढत बरोबरीची मानत आहे. यानंतर जो संघ लय कायम राखेल त्याला जिंकण्याची संधी राहील. येथे प्रत्येक धाव महत्त्वाची ठरणार आहे.’
>संघर्ष करीत असलो तरी शर्यतीत कायम - हॅरिस
‘पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध संघर्ष करीत असलो तरी अद्याप शर्यतीत कायम आहोत,’ असे आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस् हॅरिसचे मत आहे. पहिली कसोटी खेळणारा हॅरिस म्हणाला,‘आमचा संघ लढतीत अद्याप कायम आहे.
हॅरिस म्हणाला, ‘भारताने टिच्चून मारा केला. आमच्यासाठी हा कठीण दिवस होता पण फलंदाजी चांगलीच झाली. येथे धावा काढणे सोपे नाही. त्यामुळेच तगडी आव्हान देऊ, असे माझे मत आहे.’