नॉटिंघम : इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने सांगितले की, सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम बनवल्यानंतर आता त्यांच्या संघाचे लक्ष्य ५०० धावांचा विक्रम करण्याचे आहे.’
मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ बाद ४८१ धावा करुन २४२ धावांनी विजय मिळवला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. मॉर्गनने सांगितले, ‘मला वाटते की आम्ही पाचशे धावांच्या खूप जवळ होते. आम्ही चांगल्या स्थितीत होते. तेव्हा सहा षटके बाकी होते. आम्ही कल्पनादेखील केली नव्हती.’ (वृत्तसंस्था)