Join us  

भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दावेदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:14 AM

Open in App

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे; परंतु इंग्लंडचे गोलंदाजी आक्रमण थोडे सरस आहे. त्यामुळे आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दावेदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे.स्टेन म्हणाला, ‘‘विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात काही चांगले निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. मी विराटला चांगल्यारीतीने जाणतो. तो खूप दृढनिश्चय असणारा खेळाडू आहे. पाच कसोटी सामने हे एका संघासाठी चांगले होईल आणि जर संघ शानदार खेळल्यास दुसऱ्याला पराभव पत्करावा लागेल.’’ हा ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आला होता. तो म्हणाला, ‘‘मी विराट जाणतो. त्यामुळे ही कसोटी मालिका चुरशीची होईल. इंग्लंडच्या गोलंदाजांत थोडे जास्त कौशल्य आहे आणि त्यामुळेच अंतर निर्माण होईल व ही बाब खूप महत्त्वपूर्ण असेल.’’भारतीय गोलंदाजी आक्रमणात बुमराह पहिल्या कसोटीसाठी, तर भुवनेश्वर कुमार कमीत कमी तीन कसोटी सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतासाठी सर्व काही सोपे ठरणार नाही. स्टेन म्हणाला, ‘‘ भारतीय संघ येथे वनडे मालिका खेळला आहे आणि आतापर्यंतचा त्यांचा दौरा चांगला राहिला आहे. तथापि, मी जर पैसे लावेल तर ते इंग्लंडवर; परंतु ही खूप चुरशीची मालिका असेल.’’वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणार?गत दोन वर्षांपासून दुखापतीशी संघर्ष करीत असलेला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन इंग्लंडमध्ये होणाºया विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या स्पर्धेतून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. तथापि, कसोटीत जास्तीत जास्त खेळण्याची त्याची इच्छा आहे. २0१९ वर्ल्डकपनंतरही कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार असल्याचे त्याने सांगितले. स्टेन म्हणाला, ‘मी इंग्लंडमध्ये वर्ल्डकपपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करीन; परंतु वर्ल्डकपनंतर मी दक्षिण आफ्रिकेकडून पांढऱ्या चेंडूने खेळेल असे मला वाटत नाही. पुढील वर्ल्डकप येईल तोपर्यंत मी ४0 वर्षांचा होईन.’ अनुभवच वर्ल्डकप संघात स्थान मिळवून देण्यास मदत करील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

टॅग्स :द. आफ्रिकाभारत विरुद्ध इंग्लंड