लंडन : पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसºया कसोटी सामन्यात अॅलेस्टर कुकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा केल्या आहेत. दिवसअखेर अॅलेस्टर कुक १७८ चेंडूंत १0 चौकारांसह ८२ आणि बेन स्टोक्स २१ धावांवर खेळत होते.
दक्षिण आफ्रिकेकडून वर्नोन फिलेंडरने १७ धावांत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांची सुरुवात सनसनाटी झाली. वर्नोन फिलेंडर याने सामन्याच्या चौथ्याच षटकांत सलामीवीर केटॉन जेनिंग्ज याला भोपळाही फोडू न देता थर्डस्लिपमध्ये उभ्या असणाºया एल्गरकरवी झेलबाद केले. तेव्हा इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या १२ धावा होत्या. त्यानंतर अॅलेस्टर कुक आणि टॉम वेस्टले यांनी दुसºया गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी करीत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु ख्रिस मॉरिस याने टॉम वेस्टले (२५) याला दुसºया स्लीपमध्ये उभ्या असणाºया ड्युप्लेसिसकरवी झेलबाद करीत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.
अॅलेस्टर कुक आणि कर्णधार जो
रुट ही या जोडीने तिसºया गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली; परंतु
ही डोईजड होणारी जोटी फिलेंडरने
जो रुट (२९) याला बाद करीत फोडली.
विशेष म्हणजे जो रुट याचा उडालेला झेल क्विंटन डिकॉक याने उजवीकडे सूर मारत एका हाताने टिपत दक्षिण आफ्रिकेला महत्त्वपूर्ण तिसरे यश मिळवून देण्यात योगदान दिले. त्यानंतर मलान याला रबाडा याने मलान याला बाद करीत इंग्लंडला जोरदार धक्का दिला; परंतु त्यानंतर कुकने बेन स्टोक्स याच्या साथीने ५१ धावांची भागीदारी करीत आणखी पडझड होऊ दिली नाही.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५९ षटकांत ४ बाद १७१. (अॅलेस्टर कुक खेळत आहे ८२, टॉम वेस्टले २५, जो रुट २९, बेन स्टोक्स खेळत आहे २१. वर्नोन फिलेंडर २/१७, मॉरीस १/४८, रबादा १/३२).