Join us  

वेस्ट इंडिजला कमकुवत समजू नका - कार्लोस ब्रेथवेट

कोलकाता : विश्वचषकात वेस्ट इंडिजला कमकुवत मानण्याची कुणी चूक करू नये, असा इशारा या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडूकार्लोस ...

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 23, 2019 5:28 AM

Open in App

कोलकाता : विश्वचषकात वेस्ट इंडिजला कमकुवत मानण्याची कुणी चूक करू नये, असा इशारा या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडूकार्लोस ब्रेथवेट याने दिला. इंग्लंडविरुद्ध कामगिरीची पुनरावृत्ती झाल्यास आयसीसी विश्वचषक उंचावण्याची आम्हाला देखीलसंधी असेल, असे मत ब्रेथवेटने व्यक्त केले.वेस्ट इंडिजने अलीकडे इंग्लंडला कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केले. वन डे मालिका मात्र २-२ अशी बरोबरीत राहिली.तो म्हणाला,‘आमच्या संघावर ‘छुपा रुस्तम’ किंवा प्रबळ दावेदार असा ठप्पा लागावा, अशी मुळीच इच्छा नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो असून या बळावरच विश्वचषक जिंकण्याची इच्छा आहे. तिसरा विश्वचषक जिंकण्याच्या जिद्दीनेच आम्ही इंग्लंडमध्ये दाखल होणार आहोत. खेळाडूंचा दृष्टिकोन देखील असाच आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर विश्वचषक जिंकण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.’ आंद्रे रसेलच्या रूपाने जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू विंडीजकडे उपलब्ध असल्याचा दावा ब्रेथवेटने केला. आंद्रे हा वन डेत जगात सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे.मी त्याच्याकडून बरेच काहीशिकलो. अनेक गुण त्याच्याकडून घेता येण्यासारखे आहेत.कोलकाता नाईट रायडर्सने त्याला पाच कोटीत खरेदी केले. माझ्या लहान कारकीर्दीत केकेआरने नेहमी माझ्यावर बोली लावली. ही कौटुंबिक संकल्पना असल्याचा मला भास होत असल्याची प्रतिक्रिया ब्रेथवेटने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)आमच्या संघाला प्रबळ दावेदार म्हणावे अशी माझी इच्छा नाही. मात्र, आम्ही चांगला खेळ केलेला आहे.या बळावरच विश्वचषक जिंकण्यासाठी आम्ही इंग्लंडमध्ये जाणार आहोत.त्यामुळे आम्हाला कमकुवत समजू नका-कार्लोस ब्रेथवेट

टॅग्स :वेस्ट इंडिज