Join us  

धोनी-कुलदीपनं वाचवली भारताची लाज

माजी कर्णधार धोनी आणि कुलदीप यादवनं भारताच्या नावावर होणारा लाजिरवाणा विक्रम होण्यापासून वाचवलं आहे.

By namdeo.kumbhar | Published: December 10, 2017 1:59 PM

Open in App

धर्मशाला - येथे सुरु असलेल्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. सध्या भारतानं आठ गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार धोनी आणि कुलदीप यादवनं भारताच्या नावावर होणारा लाजिरवाणा विक्रम होण्यापासून वाचवलं आहे.  भारतानं 29 धावांत सात गडी गमावले होते. एकदिवसीय सामन्यात भारत सर्वाधिक नीचांकी धावसंख्येवर बाद होणार असे वाटत असतानाच धोनी-कुलदीप जोडीनं सयंमी फलंदाजी करत भारतीय संघाची लाज वाचवली. धोनी-कुलदीपनं आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपनं 19 धावांची खेळी केली. धोनी सध्या 32 धावांवर खेळत आहे. 

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक नीचांकी धावसंक्या झिम्बांबेच्या नावार आहे. 25 एप्रिल 2004 मध्ये लंकेविराधात खेळताना झिम्बांबेचा संघ अवघ्या 35 धावांवर बाद झाला होता. भारताची सर्वाधिक नीचांकी धावसंख्या 54 ही श्रीलंकेविराधतच आहे. धोनी-कुलदीपनं संयमी फलंदाजीच्या जोरावर या नकोशा विक्रमापासून भारताला वाचवलं आहे. 

(सौजन्य - cricwaves.com)

श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला खातेही उघडता आले नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात मॅथ्यूजने श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार रोहित शर्मालाही सुरंगा लकमलने बाद केले. त्यानंतर 18 चेंडूचा सामना करुन दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. सुरंगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़ घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला सात गडी बाद केले आहेत. हार्दिक पांड्या दोन चौकारांसह 10 आणि श्रेयस अय्यरने 1 चौकारासह 9 धावा केल्या.  

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 असे निभ्रळ यश मिळवल्यास आयसीसी एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारत अव्वल स्थान गाठू शकेल. आयसीसी क्रमवारीतील सुधारणेसाठी भारताच्या दृष्टिने ही मालिका महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे कसोटीतील अपयशाची परतफेड करण्यासाठी श्रीलंकन खेळाडूंसमोर आव्हान असेल.

सलग पाच द्विपक्षीय मालिका जिंकणारा भारतीय संघ ही मालिका ३-० ने जिंकल्यास द. आफ्रिकेला मागे सारून वन-डेतही अव्वल स्थानावर विराजमान होईल. मागच्या वन-डे मालिकेत भारताने लंकेला ५-० असे नमविले होते. विराटच्या अनुपस्थितीत रोहित, कार्तिक, धोनी, केदार जाधव हे फलंदाजीत योगदान देण्यास सज्ज आहेत.

टॅग्स :एम. एस. धोनी