Join us  

धवन, राहुल यांनी सावरले, भारत दुसरा डाव १ बाद १७१

कोलकाता : सलामीवीर शिखर धवन (९४) व के. एल. राहुल (नाबाद ७३) यांनी अर्धशतके झळकावत श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी भारताला संकटातून सावरले आणि ४९ धावांची आघाडी मिळवून दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:03 AM

Open in App

कोलकाता : सलामीवीर शिखर धवन (९४) व के. एल. राहुल (नाबाद ७३) यांनी अर्धशतके झळकावत श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी भारताला संकटातून सावरले आणि ४९ धावांची आघाडी मिळवून दिली. ईडन गार्डन्सवरील अनुकूल स्थितीचा लाभ घेताना धवन व राहुल यांनी १६६ धावांची भागीदारी केली. या दोघांनी श्रीलंकेची पहिल्या डावातील १२२ धावांची आघाडी भरून काढताना भारताला चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत आघाडी मिळवून दिली. चौथ्या दिवसअखेर भारताने दुसºया डावात १ बाद १७१ धावा केल्या होत्या. त्या वेळी राहुलच्या साथीला चेतेश्वर पुजारा (२) खेळपट्टीवर होता.सूर्यप्रकाशामुळे खेळपट्टी ठणठणीत झाल्यानंतर फलंदाजांना स्ट्रोक्स खेळताना अडचण भासत नव्हती. धवन व राहुल यांनी लूज चेंडूंची प्रतीक्षा करीत फटकेबाजी केली. धवनने फिरकीपटूंविरुद्ध बॅकफूटचा वापर केला. त्याचे शतक केवळ सहा धावांनी हुकले. वेगवान गोलंदाज दासून शनाकाने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. धवनने ११६ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व २ षटकार लगावले. राहुलने ११३ चेंडूंच्या खेळीमध्ये ८ चौकार ठोकले.त्याआधी, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उजव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतरही गोलंदाजी करताना सकाळच्या सत्रात तीनबळी घेतले. पण श्रीलंकेच्याशेवटच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करीत संघाला २९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवनेश्वरने ८८, तर शमीने १०० धावांत प्रत्येकी ४ बळी घेतले.भारताला श्रीलंकेच्या उर्वरितसहा फलंदाजांना बाद करण्यासाठी३८ षटके गोलंदाजी करावी लागली. श्रीलंकेतर्फे नवव्या क्रमांकावर आलेल्या रंगाना हेराथने सर्वाधिक६७ धावा केल्या. श्रीलंका संघाने१२२ धावांची आघाडी घेतली.(वृत्तसंस्था)>परेराने ड्रेसिंग रूमकडे बघून घेतला रिव्ह्यूश्रीलंकेचा फलंदाज दिलरुवान परेराने मैदानी पंच नायजेल लाँग यांनी पायचित दिल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे बघून रिव्ह्यू घेतला. त्याचा रिव्ह्यू यशस्वी ठरला असला तरी त्याची ही कृती मात्र कॅमेºयामध्ये टिपली गेली.डावाच्या ५७ व्या षटकात खाते उघडण्यापूर्वीच परेराला पंच लाँग यांनी पायचित बाद दिले होते. त्यानंतर परेराने दुसºया टोकावर उभ्या असलेल्या रंगाना हेराथकडे बघितले आणि त्यानंतर तंबूकडे परतायला लागला. पण, ड्रेसिंग रूममध्ये वळल्यानंतर त्याने अचानक रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. रिव्ह्यूमध्ये तिसºया पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला.परेरापूर्वी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही भारताविरुद्ध मार्चमध्ये बंगळुरू कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूमकडे बघून रिव्ह्यूसाठी इशारा केला होता. परेराला मात्र ड्रेसिंग रूममधून कुठली मदत मिळाली किंवा नाही, हे मात्र स्पष्ट झाले नाही.नियमानुसार रिव्ह्यूसाठी क्षेत्ररक्षण करणाºया संघाच्या कर्णधाराला मैदानावरील सहकारी खेळाडूंकडून तर फलंदाजाला दुसºया टोकावर उभ्या असलेल्या फलंदाजाकडून सल्ला घेण्याचा अधिकार आहे. आयसीसीच्या नियमानुसार जर पंचाला रिव्ह्यूसाठी मैदानाबाहेरून मदत मिळाली असे वाटले तर तो रिव्ह्यू रद्द करण्याचा अधिकार आहे.>परेराने ड्रेसिंग रूमची मदत घेतली नाही : एसएलसीपरेराने डीआरएससाठी ड्रेसिंग रूमची मदत घेतली नसून रेफरलच्या उपलब्धतेबाबत मनात साशंकता असल्यामुळे उशिरा रिव्ह्यू घेतला, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.>संयम राखणे आवश्यक होते : भुवनेश्वरखेळपट्टीकडून गोलंदाजांना मिळत असलेल्या मदतीनंतर भारतीय फलंदाजांना अडचणीत बघितल्यानंतर आमच्यात उत्साह संचारला आणि त्यामुळेच तिसºया दिवशी उत्साहाच्या भरात प्रतिस्पर्धी संघाला अधिक धावा बहाल झाल्या, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली.>मोठी आघाडी मिळाल्यामुळे ‘लकी’ आहोत : हेराथभारताविरुद्ध पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळवण्याचे सर्व श्रेय आमच्या वेगवान गोलंदाजांना जाते, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘आघाडी मिळवण्याचे सर्व श्रेय वेगवान गोलंदाजांना जाते. पहिल्या २ दिवसांच्या तुलनेत आज खेळपट्टी चांगली होती. त्यामुळे काही धावा फटकावता आल्या व १२२ धावांची आघाडी घेता आली.’>धावफलकभारत पहिला डाव : १७२. श्रीलंका पहिला डाव : रुदिरा समरविक्रमा झे. साहा गो. भुवनेश्वर २३, दिमुथ करुणारत्ने पायचित गो. भुवनेश्वर ०८, लाहिरू थिरीमन्ने झे. कोहली गो. यादव ५१, अँजेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव ५२, दिनेश चंडीमल झे. साहा गो. शमी २८, निरोशन डिकवेला झे. कोहली गो. शमी ३५, दासून शनाका पायचित गो. भुवनेश्वर ००, दिलरुवान परेरा झे. साहा गो. शमी ०५, रंगाना हेराथ झे. शमी गो. भुवनेश्वर ६७, सुरंगा लकमल त्रि. गो. शमी १६. अवांतर : ९. एकूण : ८३.४ षटकांत सर्व बाद २९४. बाद क्रम : १-२९, २-३४, ३-१३३, ४-१३८, ५-२००, ६-२०१, ७-२०१, ८-२४४, ९-२९०, १०-२९४. गोलंदाजी : भुवनेश्वर २७-५-८८-४, शमी २६.५-५-१००-४, यादव २०-१-७९-२, आश्विन ८-२-१३-०, जडेजा १-०-१-०, कोहली १.१-०-५-०.भारत दुसरा डाव : के. एल. राहुल खेळत आहे ७३, शिखर धवन झे. डिकवेला गो. शनाका ९४, चेतेश्वर पुजारा नाबाद ०२. अवांतर : २. एकूण : ३९.३ षटकांत १ बाद १७१. बाद क्रम : १-१६६. गोलंदाजी : लकमल ८-०-२९-०, गमागे ९-०-४७-०, शनाका ९.३-०-२९-१, परेरा १०-०-४१-०, हेराथ ३-०-२५-०.

टॅग्स :क्रिकेट