Join us  

द. आफ्रिकेची आॅस्ट्रेलियावर मात

वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी दुस-या कसोटीत आॅस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी १-१ अशी बरोबरी साधली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:31 AM

Open in App

पोर्ट एलिझाबेथ : वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी दुस-या कसोटीत आॅस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी १-१ अशी बरोबरी साधली.दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १0१ धावांचे लक्ष्य मिळाले ते त्यांनी ४ गडी गमावून गाठले. त्याआधी रबाडाने ५४ धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३९ धावांत गुंडाळला.विजयासाठी छोटेसे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने चार फलंदाज गमावले. पहिल्या डावात १२६ धावांची नाबाद खेळी करून विजयाचा पाया रचणारा फलंदाज अ‍ॅबी डिव्हिलियर्सने दुसºया डावात २६ चेंडूंत २८ धावा केल्या. तो फिरकी गोलंदाज लियोनच्या चेंडूंवर शॉर्टलेगवर झेल देऊन बाद झाला.तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने कालच्या ५ बाद १८0 या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली; परंतु रबाडाने प्रारंभीच तीन फलंदाजांना तंबूत धाडताना आॅस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या रचण्याचे मनसुबे उधळून लावले. रबाडाने या सामन्यात एकूण १५0 धावा देत ११ गडी बाद केले. एकाच सामन्यात १0 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची रबडाने त्याच्या २८ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत ही चौथ्यांदा किमया साधली आहे. पहिल्याच षटकात रबाडानेमिशेल मार्शला तंबूत धाडले.त्यानंतर त्याच्याच चेंडूवर कमिन्स गलीमध्ये उभ्या असलेल्या थियुनिसडि ब्रुन याच्या हाती झेल देऊन परतला.>संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : २४३ व दुसरा डाव २३९. (उस्मान ख्वाजा ७५, मिशेल मार्श ४५. कॅगिसो रबाडा ६/५४). दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ३८२. दुसरा डाव : २२.५ षटकांत ४ बाद १0२. (अ‍ॅबी डिव्हिलियर्स २८, हाशिम अमला २७, मार्कराम २१. नाथन लियोन २/४४).