लंडन : येथे वरुणराजाच्या दमदार हजेरीमुळे भारतविरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ ‘बंद’ पडला. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे दिवसभरात खेळ सुरुच झाला नाही. विशेष म्हणजे नाणेफेकही न झाल्याने भारतीय संघाने काय बदल केले याचीही उत्सुकता आणखी वाढली. स्थानिक वेळेनुसार सायंकळी ४ वाजून ५० मिनिटाला खेळ रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. आता उर्वरीत चार दिवशी प्रत्येकी ९६ षटकांचा खेळ होईल.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर पडला. मात्र ऐतिहासिक लॉडर््स मैदानावरील दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताकडे आहे. परंतु, सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या उपस्थितीमुळे हवामान खेळण्यायोग्य न राहिल्याने पहिला दिवसाचा खेळ सुरु झाला नाही. बुधवार रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने गुरुवारी एकाही चेंडूचा खेळ् झाला नाही. ढगाळ वातावरण व हवा नसल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही वर्तविले जात आहे. यामुळे सामनाधिकाºयांनी निर्धारीत वेळेच्या अर्धा तास आधीच ‘लंच ब्रेक’चा निर्णय घेतला.
यानंतर चहापानाची वेळ उलटल्यानंतरही काहीच बदल न झाल्याने खेळ रद्द करण्यात आला. दरम्यान, लॉडर््स मैदानावरील डेÑनेज सुविधा अत्यंत उच्च दर्जाची असल्याने हवामानात सुधारणा झाल्यास खेळाला सुरुवात होऊ शकेल,
असेही म्हटले जात होते.
इंग्लंडने बुधवारी आपला १२ सदस्यांचा संघ जाहीर करत २० वर्षीय आॅलिव्हर पोप याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली. त्याचवेळी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, आता एकूण परिस्थिती पाहता यामध्ये बदल होऊ शकतो. (वृत्तसंस्था)