Join us  

चढाओढ अव्वल स्थानाची; आयपीएल ०१ दिवस शिल्लक

सुरेश रैना यंदा आयपीएल खेळणार नसल्याचे चित्र असल्याने कोहलीला यंदा आपल्या अव्वल स्थानाला अधिक बळकटी देता येईल. तसेच रोहित शर्माकडे दुसऱ्या स्थानावर येण्याची मोठी संधी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:46 AM

Open in App

- रोहित नाईकआयपीएल प्रमुख विक्रमांवर नजर टाकल्यास भारतीय खेळाडू आघाडीवर असल्याचे दिसून येईल. सर्वाधिक धावा फटकाविणारे अव्वल पाचपैकी चार फलंदाज भारतीय आहेत. त्याचप्रमाणे, सर्वाधिक बळी मिळविणारे अव्वल पाचपैकी तीन गोलंदाज भारतीय आहेत. त्यामुळेच यंदा कोण आयपीएल गाजविणार या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.सुरेश रैना यंदा आयपीएल खेळणार नसल्याचे चित्र असल्याने कोहलीला यंदा आपल्या अव्वल स्थानाला अधिक बळकटी देता येईल. तसेच रोहित शर्माकडे दुसऱ्या स्थानावर येण्याची मोठी संधी आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी १३ बळींच्या फरकाने दुसºया स्थानावर असलेल्या अमित मिश्राला अव्वल स्थानासाठी घाम गाळावा लागेल. डेव्हिड वॉर्नरकडेही चांगली संधी आहे. कारण रोहित आणि त्याच्या धावांमध्ये १९२ धावांचा फरक आहे. त्यामुळे तो तिसºया स्थानावर येऊ शकतो.आयपीएलचे अव्वल फलंदाजविराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर)सामने : १७७, धावा : ५,४१२, स्ट्राईक रेट : १३१.६१, ५०/१०० : ३६/५.सुरेश रैना (चेन्नई सुपरकिंग्ज) :सामने : १९३, धावा : ५,३६८, स्ट्राईक रेट : १३७.१४, ५०/१००: ३८/१.रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)सामने : १८८, धावा : ४,८९८, स्ट्राईक रेट : १३०.८२, ५०/१०० : ३६/१.डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद)सामने : १२६, धावा : ४,७०६, स्ट्राईक रेट : १४२.३९, ५०/१०० : ४४/४.शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स)सामने : १५९, धावा : ४,५७९, स्ट्राईक रेट : १२४.८०, ५०/१०० : ३७/०.आयपीएलचे अव्वल गोलंदाजलसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स) :सामने : १२२, बळी : १७०, सर्वोत्तम : ५/१३, ४ किंवा अधिक बळी : ७ वेळा.अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स) :सामने : १४७, बळी : १५७, सर्वोत्तम : ५/१७, ४ किंवा अधिक बळी : ४ वेळा.हरभजन सिंग (चेन्नई सुपरकिंग्ज) :सामने : १६०, बळी : १५०, सर्वोत्तम : ५/१८, ४ किंवा अधिक बळी : २ वेळा.पीयूष चावला (चेन्नई सुपरकिंग्ज) :सामने : १५७, बळी : १५०, सर्वोत्तम : ४/१७, ४ किंवा अधिक बळी : २ वेळा.ड्वेन ब्रावो (चेन्नई सुपरकिंग्ज) :सामने : १३४, बळी : १४७, सर्वोत्तम : ४/२२, ४ किंवा अधिक बळी : २ वेळा.

टॅग्स :आयपीएल 2020