Join us  

चिन्नास्वामी स्टेडियमला आपला ‘गड’ बनवावा लागेल

एबी डिव्हिलियर्स लिहितात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 7:11 AM

Open in App

रोमचे प्रसिद्ध भाष्यकार मार्कस् ट्युलियस यांचे वक्तव्य आयपीएलशी जोडता येईल. दोन हजार वर्षांआधी त्यांनी केलेल्या भाष्याची आजही चेन्नई ते मुंबई आणि त्याहून पुढे देखील प्रासंगिकता कायम आहे, ही बाब वेगळी. ‘तुम्हाला टी-२० त यशस्वी व्हायचे असेल तर घरच्या मैदानावरील सामने हमखास जिंकावेच लागतील.’तुम्ही घरच्या मैदानावर चाहत्यापुढे खेळत असाल तर आदर्शपणे आपल्याला अनुकूल परिस्थिती लाभते. अशावेळी परिस्थितीची जाण ठेवून अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्याची सहजता लाभते. याशिवाय आपल्या योजना आणि डावपेच अमलात आणण्याची मोकळीकही लाभते.आयपीएलच्या इतिहासात दोनच संघ असे आहेत की ज्यांनी घरच्या मैदानाला स्वत:चा गड बनविले. हे सत्य देखील आहे. मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टवरील उसळी आणि वेग यांचा आधार घेतो. संघातील विश्वदर्जाचे गोलंदाज याचा लाभ घेत असल्याने मुंबईने आयपीएलमध्ये तीनदा जेतेपद पटकविले. २०१३ मध्ये तर मुंबई संघाला त्यांच्या घरी पराभूत करणे एकाही संघाला जमले नव्हते. २०१५ च्या सत्रात मुंबईने घरच्या मैदानावर सातपैकी पाच सामने जिंकले तर २०१७ मध्ये पाचपैकी पाच सामन्यात विजय मिळविण्यात हा संघ यशस्वी ठरला होता.चेन्नई सुपरकिंग्सचा देखील घरच्या मैदानावरील रेकॉर्ड शानदार आहे. चेपॉकची मंद खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदत करणारी आहे. रवींद्र जडेजा, हरभजनसिंग आणि इम्रान ताहीर हे फिरकीचे त्रिकूट धोनीसाठी सरस कामगिरी बजावत आहे. तिन्ही गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवण्याचे काम करतात. प्रतिस्पर्धी फलंदाजांना अधिक धावा काढण्याची मोकळीक देखील मिळत नाही.सीएसकेने घरच्या मैदानावर सर्व ४ सामने जिंकले. त्यामुळे लीगच्या अर्ध्यातच त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी लाभली. एक संघ या नात्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला देखील चिन्नास्वामी स्टेडियमला स्वत:चा ‘गड’ बनवावा लागेल. या मैदानावरील सरासरी धावसंख्या देखील मोठी आहे. तथापि आम्ही आतापर्यंत या मैदानाची मागणी लक्षात घेऊन संघ उतरवू शकलो नाही. आता पुढील सामन्यांकडे लक्ष लागलेले असताना माझ्या कानात काही शब्द वारंवार गुंजतात ते असे... एक व्यक्ती स्वत:च्या घरात अधिक पवित्र, बलाढ्य, सुरक्षित होणे हे चांगले लक्षण नव्हे का? आरसीबीला यापेक्षा अधिक काय हवे.