Join us  

चेतेश्वर पुजाराचे विक्रमी १२वे प्रथमश्रेणी द्विशतक, विजय मर्चंट यांचा मोडला विक्रम ! 

चेतेश्वर पुजारा आज प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक दुहेरी शतक बनवणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने सौराष्ट्रकडून खेळताना झारखंडविरोधात १२ वे प्रथम श्रेणी द्विशतक झळकावले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:53 AM

Open in App

राजकोट : चेतेश्वर पुजारा आज प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक दुहेरी शतक बनवणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने सौराष्ट्रकडून खेळताना झारखंडविरोधात १२ वे प्रथम श्रेणी द्विशतक झळकावले.चेतेश्वर पुजारा याने विजय मर्चंट यांचा ११ द्विशतकांचा विक्रम मोडला.पुजाराने ३५५ चेंडूंचा सामना करताना २८ चौकार लगावले. त्यासोबतच चिराग जानी याने शतक झळकावले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी २१५ धावांची भागीदारी केली.सौराष्ट्रने आपला पहिला डाव ५५३ धावांवर घोषित केला. तर प्रत्युत्तरात झारखंडने २ गडी बाद ५२ धावा केल्या.रणजी स्पर्धा ज्यांच्या नावाने भरवली जाते त्या नवानगरचे संस्थानिक के.एस. रणजितसिंहजी यांनी १४ द्विशतके झळकावली होती. मात्र त्या वेळी ते इंग्लंड संघाकडून खेळत होते.  त्यांनी केम्ब्रिज युनिर्व्हसिटी, ससेक्स आणि लंडन काऊंटी या संघाकडून खेळताना ही कामगिरी केली होती. ते इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे सदस्य होते.भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विजय मर्चंट यांच्या नावावर होता हा विक्रम पुजाराने आज मागे टाकला. विजय हजारे,सुनिल गावस्कर आणि  राहूल द्रविड  यांनी प्रत्येकी दहा द्विशतके झळकावली आहेत.जागतिक क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर ३७ प्रथमश्रेणी द्विशतकांचा विक्रम आहे.

टॅग्स :क्रिकेट