Join us  

चेन्नई एक्स्प्रेस सुसाट...

सलामीवीर शेन वॉटसन (११७*) याने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमधील आपला दबदबा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:39 AM

Open in App

- रोहित नाईकमुंबई - सलामीवीर शेन वॉटसन (११७*) याने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमधील आपला दबदबा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले. या शानदार कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ विजेतीपदे पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ बाद १७८ धावा फटकावल्यानंतर चेन्नईने १८.३ षटकांतच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १८१ धावा काढल्या.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तोडीस तोड खेळ झाला. पण तब्बल सहा अंतिम सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चेन्नईच्या नियोजनबद्ध खेळीपुढे हैदराबादचा निभाव लागला नाही. २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर हैदराबाद पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत होते. पण त्यांच्या खेळीत आत्मविश्वासाचा अभाव दिसला. धावांचा पाठलाग करणाºया चेन्नईला सुरुवातीला जखडवून ठेवल्यानंतर हैदराबाद आपल्या बलाढ्य गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईचे स्वप्न धुळीस मिळवणार, असे दिसत होते. मात्र, खेळपट्टीचा योग्य अंदाज घेतल्यानंतर सावध सुरुवात केलेल्या वॉटसनने संपूर्ण सामन्यात आपलाच दबदबा राखला.वॉटसनने अखेरपर्यंत संघाचा किल्ला लढवताना ५७ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ११७ धावांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे त्याने झळकावलेले शतक आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यातील केवळ दुसरेच शतक ठरले. तसेच यंदाच्या सत्रात वॉटसनचे हे दुसरे, तर स्पर्धा इतिहासात एकूण चौथे शतक ठरले. फाफ डू प्लेसिस (१०) अपयशी ठरल्यानंतर सुरेश रैनाने २४ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३२ धावा करत वॉटसनला चांगली साथ दिली. वॉटसन - रैना यांनी दुसºया गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी करून संघाचा विजय आवाक्यात आणला. १४ व्या षटकात रैना बाद झाल्यानंतर अंबाती रायुडूने १९ चेंडूंत नाबाद १६ धावा काढून वॉटसनला अखेरपर्यंत साथ दिली.तत्पूर्वी, कर्णधार केन विल्यम्सन आणि युसुफ पठाण यांच्या जोरावर हैदराबादने आव्हानात्मक मजल मारली. विल्यम्सनने ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७, तर युसुफने २५ चेंडंूत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय शिखर धवन (२६), शाकिब- अल-हसन (२३) आणि कार्लोस ब्रेथवेट (२१) यांनीही चांगली फलंदाजी केली. लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकूर,कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्हो आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला.संक्षिप्त धावफलकसनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १७८ धावा (केन विल्यम्सन ४७, युसुफ पठाण ४५; रवींद्र जडेजा १/२४, कर्ण शर्मा १/२५, लुंगी एन्गिडी १/२६, शार्दुल ठाकूर १/३१, ड्वेन ब्राव्हो १/४६.) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १८.३ षटकांत २ बाद १८१ धावा (शेन वॉटसन नाबाद ११७, सुरेश रैना ३२; कार्लोस ब्रेथवेट १/२७, संदीप शर्मा १/५२.)नंबर गेम..- चेन्नईने सर्वाधिक तीन आयपीएल विजेतेपदांच्यामुंबई इंडियन्सच्या कामगिरीची बरोबरी केली.- याआधी चेन्नईने २०१० व२०११ मध्ये विजेतेपद पटकावले होते.- शेन वॉटसनने झळकावलेले शतक आयपीएल अंतिम सामना इतिहासातील दुसरे शतक ठरले.- याआधी वृद्धिमान साहाने२०१४ मध्ये अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अंतिम सामन्यात ११५ धावांची खेळी केली.- आयपीएल अंतिम सामन्यात वॉटसनने सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम नोंदवला.- पहिल्यांदाच वॉटसनने आयपीएलच्या एकाच सत्रात एकाहून अधिक शतके झळकावली. यंदा वॉटसनने २० एप्रिलला पुणे येथे राजस्थानविरुद्ध शतकझळकावले होते.- आयपीएल इतिहासात वॉटसनच्या नावावर एकूण ४ शतकांची नोंद झाली. 

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएलक्रिकेटचेन्नई सुपर किंग्स