Join us  

हैदराबाद-चेन्नई संघांत अंतिम लढतीची शक्यता

क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि त्यामुळे अनेकदा आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:24 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स

अखेरच्या टप्प्यात रुळावर आलेल्या आरसीबी संघाचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास साखळी फेरीत जयपूरमध्ये थांबला. आता सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्स, कोलकाता नाईटरायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्ले-आॅफसाठी पात्र ठरले. त्याबाबत आम्हाला कुठली तक्रार नाही.जर आम्ही शनिवारी राजस्थान रॉयल्सचा पराभव करण्यात यशस्वी ठरलो असतो तर आम्ही प्ले-आॅफसाठी पात्र ठरलो असतो, हे कळल्यानंतर निराश झालो. एकवेळ आम्ही विजयाकडे आगेकूच करीत होतो, पण राजस्थानच्या फिरकीपटूंनी सामन्याचे चित्र पालटले. त्यांनी टाकलेल्या काही अचूक षटकांमुळे विजय मिळवण्याच्या आमच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले.यंदाच्या मोसमात बरेचदा आम्ही अनावश्यक धावा बहाल केल्या आणि गरज असताना भागीदारी करण्यात अपयशी ठरलो. टी-२० क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि त्यामुळे अनेकदा आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. आम्हाला १४ पैकी केवळ सहा सामने जिंकता आले, हे निराशाजनक आहे, पण एकत्रित होऊन विजय मिळवण्यापूर्वी पराभवाच्यावेळी एकत्रित असणे आवश्यक असते, असे अनेकदा म्हटल्या जाते. माझेही तेच मत आहे. यंदा लौकि काला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलो असलो तरी २०१९ च्या मोसमासाठी आम्ही मजबूत पायाभरणी करण्यात यशस्वी ठरलो.२००८ मध्ये सुरुवात झालेल्या आयपीएलमध्ये मी सुरुवातीपासून खेळत असल्यामुळे स्वत:ला नशिबवान समजतो. २०१८ च्या पर्वाचा मी सर्वाधिक आनंद घेतला, असे मला म्हणता येईल. आरसीबी संघात अनन्यसाधारण जोश आहे. चांगल्या व वाईट समयी खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफने एकमेकांची साथ देत उत्साह वाढविला. या संघात अनेक शानदार व्यक्ती आहेत. आम्हाला सांघिक कामगिरी करता आली नाही, पण या कालावधीत आम्ही एकमेकांना चांगले जाणून घेतले. पुढील मोसमात आम्ही प्रतिस्पर्धी संघ म्हणून नक्कीच परतू, असा मला विश्वास आहे. पुढील आयपीएल पुढच्याच आठवड्यात सुरू व्हायला हवे, असे मला का वाटते, हे कळत नाही. यंदाच्या मोसमाच्या विजेत्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. चारपैकी कुठलाही संघ कुणालाही पराभूत करू शकतो. आयपीएलची रंगत कायम आहे. त्यात विजेत्याबाबत भाकीत वर्तविणे सोपे नाही. तरी माझ्या मते केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्स संघांदरम्यान अंतिम लढत होईल, अशी आशा आहे आणि अंतिम लढतीत पुन्हा एकदा एम.एस. धोनीची जादू चेन्नईला जेतेपद पटकावून देईल. (टीसीएम) 

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेट