Join us  

Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा

'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत

By प्रसाद लाड | Published: September 18, 2018 3:42 PM

Open in App
ठळक मुद्देहाँगकाँगने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताने त्यांनी कमी लेखू नये, असे लाड सर म्हणाले.

मुंबई : भारताचा कर्णधार कुणीही असो. तो विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा, पण भारताने आगामी विश्वचषक जिंकायला हवा, असे मत 'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एका खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्याचे औचित्य साधून लोकमतने त्यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आशिया चषकासह अन्य बऱ्याच विषयांवर भाष्य केले.

विश्वचषकासाठी संघबांधणी करताना रोहितकडे कर्णधारपद द्यायला हवे, अशी चर्चा सुरु होती. याविषयी विचारचे असता लाड सर म्हणाले की, " विराट हा एक चांगला फलंदाज आहे. इंग्लंड दौऱ्यातही त्यानेच जास्त केल्या. आपण त्याच्यामुळे हरलो आहोत, असे म्हणता येणार नाही. एक कर्णधार म्हणून त्याचा बॅडपॅच सुरु आहे. दुसरीकडे रोहितने आपल्यावर दिलेली कर्णधारपदाची जबाबदारी चोख निभावली आहे. पण विश्वचषक जिकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. एक क्रिकेट प्रशिक्षक म्हणून माझेही आहेच. त्यामुळे संघाचा कर्णधार विराट असो किंवा रोहित भारताने विश्वचषक जिंकणे महत्त्वाचे आहे. " 

रोहितने आपल्या कामगिरीतून संघापुढे आदर्श ठेवायला हवारोहितकडे आशिया चषक स्पर्धेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांने या पदाला नेहमीच न्याय दिला आहे. या स्पर्धेतही खेळताना त्याने आपल्या कामगिरीतून संघापुढे आदर्श ठवणे गरजेचे आहे, असे लाड सर यांनी सांगितले.

हाँगकाँगचा पेपर सोपा नाहीभारताचा आज हाँगकाँगबरोबर पहिला सामना होणार आहे. पण हा सामना भारतासाठी सोपा नसेल. कारण हाँगकाँगने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताने त्यांनी कमी लेखू नये, असे लाड सर म्हणाले.

भारताचा पाकिस्तानविरुद्ध कस लागेलभारतासाठी सर्वात महत्त्वाचा सामना हा पाकिस्तानबरोबरचा असेल. कारण बऱ्याच दिवसांनी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर गेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. पण प्रत्येक सामना हा नवा असतो. पाकिस्तानचा संघही चांगलाच समतोल आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळताना कस लागेल, असे मत लाड सर यांनी व्यक्त केले.

रोहित आणि शार्दुल भारतीय संघात असल्याचा अभिमानभारतीय संघात एकाच वेळी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर हे दोन शिष्य आहेत. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. कारण बऱ्याचदा एका प्रशिक्षकाचे दोन खेळाडू बऱ्याच दिवसांमध्ये भारतीय संघात दिसलेले नाही, असे लाड सरांनी सांगितले.

टॅग्स :आशिया चषकरोहित शर्माविराट कोहलीशार्दुल ठाकूर