Join us  

बोपन्ना - डोडिज उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा अनुभवी टेनिसस्टार रोहन बोपन्ना याने क्रोएशियाच्या इवान डोडिजसह खेळताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:02 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी टेनिसस्टार रोहन बोपन्ना याने क्रोएशियाच्या इवान डोडिजसह खेळताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. बोपन्ना -डोडिज यांनी चुरशीच्या झालेल्या सामन्यात जुआन सेबेस्टियन काबाल आणि फॅबियो फोगनिनी या जोडीचा पाडाव केला.स्पर्धेत सातव्या मानांकन लाभलेल्या बोपन्ना - डोडिज यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना जुआन - फॅबियो यांचा ५-७, ७-५, १०-८ असा झुंजार पराभव केला. पहिला सेट गमावून पिछाडिवर पडलेल्या बोपन्ना - डोडिज यांनी जबरदस्त पुनरागमन करताना मोक्याच्यावेळी खेळ उंचाव्न जुआन - फॅबियो यांचे कडवे आव्हान परतावले. दुसरीकडे, सानिया मिर्झाने शुआई पेंग हिच्यासह इरिना कामेलिया बेगू - रालूका ओलारु यांना ६-३, ६-७, १०-३ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. (वृत्तसंस्था)