खेळात छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान

खेळामध्ये छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान सोसावे लागते. चेन्नई सुपरकिंग्सतर्फे ड्वेन ब्राव्होची सामना जिंकून देणारी खेळी शानदार होती. एक अशी लढत ज्यात चेन्नईच्या पराभवाबाबत केवळ औपचारिकता शिल्लक होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:34 AM2018-04-09T01:34:38+5:302018-04-09T01:34:38+5:30

whatsapp join usJoin us
Big loss due to small mistakes in the game | खेळात छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान

खेळात छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले लिहितात...
खेळामध्ये छोट्या चुकांमुळेही मोठे नुकसान सोसावे लागते. चेन्नई सुपरकिंग्सतर्फे ड्वेन ब्राव्होची सामना जिंकून देणारी खेळी शानदार होती. एक अशी लढत ज्यात चेन्नईच्या पराभवाबाबत केवळ औपचारिकता शिल्लक होती. ब्राव्होची खेळी केवळ टीव्हीसाठीच होती. त्यात नाट्यमयता होती. ती खेळी सर्वांच्या आकलनापल्याड होती. निश्चितच त्यासाठी योग्यता व कुशलता आवश्यक होती.
सामन्याचे १९ वे षटक बघा. मिच मॅक्लेघनने आपल्या षटकात २० धावा बहाल केल्यानंतर चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूमध्ये २७ धावांची गरज होती. १९ व्या षटकात चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती होता. डेथ ओव्हर्समधील भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये त्याची गणना होते. दोनदा त्याची लेंथ चुकली आणि चेन्नईला १० चेंडूंमध्ये १५ धावांची गरज राहिली. सामन्यात अद्याप संधी होती. ब्राव्होने थर्ड मॅनच्या दिशेने फटका लगावत एक धाव घेतली. त्याचा अर्थ ताहिरला फलंदाजी करायची होती. त्यावेळी ९ चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. मुंबई इंडियन्ससाठी ही चांगली बाब होती. त्यानंतर मुस्तफिजुरने ओव्हरथ्रोची धाव बहाल केली आणि ब्राव्हो स्ट्राईकवर आला. याचा अर्थ आता पूर्ण ६ चेंडू ब्राव्होला खेळायचे होते.
जर मुंबई इंडियन्ससाठी काही बाबी चांगल्या घडल्या असत्या तर निकाल त्यांच्यासाठी अनुकूल लागला असता. सिंगल्सवर नियंत्रण राखले असते तर निकाल काही वेगळाच लागला असता. खेळात काही सांगता येत नाही, पण प्रत्येक बाबीप्रमाणे तुम्ही या बाबीवरही नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करता. जर जाधव किंवा ब्राव्होने षटकार ठोकला तर तुमच्याकडे करण्यासारखे काही शिल्लक नसते, पण ओव्हरथ्रोसारख्या बाबीवर मात्र नियंत्रण राखता येते.
प्रशिक्षक याबबात सर्व खेळाडूंसोबत सरावादरम्यान बराच वेळ घालवितात, पण दडपणाखाली मैदानावर तुम्ही कशी कामगिरी करता, ही फरक स्पष्ट करणारी बाब ठरते.
खेळात विशेषता मोठ्या बाबी लक्षात राहतात, पण लहान बाबीच नुकसान करतात. (टीसीएम)

Web Title: Big loss due to small mistakes in the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.