Join us  

कर्णधारामुळे आक्रमक झालो, बॅकफूटवर येऊन योजनेमध्ये बदल करावे लागतात

विराट कोहलीसारख्या आक्रमक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत असल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करीत असून, कर्णधारामुळे मी अधिक आक्रमक झालो, अशी प्रतिक्रिया भारताचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने व्यक्त केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:46 AM

Open in App

चेन्नई : विराट कोहलीसारख्या आक्रमक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळत असल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करीत असून, कर्णधारामुळे मी अधिक आक्रमक झालो, अशी प्रतिक्रिया भारताचा लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने व्यक्त केली. रविवारी रात्री पहिल्या वन-डे लढतीत भारताने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर आॅस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना चहल म्हणाला, ‘मनगटाच्याजोरावर फिरकी गोलंदाजी करणारे फिरकीपटू आक्रमक असतात आणि कर्णधार जर अधिक आक्रमक असेल तर आक्रमण करण्याचे स्वातंत्र्य मिळते. कधी कधी बॅकफूटवरही यावे लागते आणि योजनेमध्ये बदल करावा लागतो.’पहिल्या वन-डेमध्ये ३० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेणाºया चहलसाठी दुसºया टोकावरून गोलंदाजी करणारा फिरकीपटू कुलदीप यादवची योग्य साथ लाभली. त्यांनी परिस्थितीनुसार योजना आखली.चहल म्हणाला, ‘आम्ही दोघेही आक्रमक गोलंदाज आहोत. त्यामुळे बळी घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परिस्थिती ओळखून गोलंदाजी करतो. जर त्याने पहिले गोलंदाजी केली तर तो मला चेंडू कुठून वळत असून फलंदाजाला कसे बाद करता येईल, याबाबत माहिती देतो. आम्ही बळींच्या शोधात असतो. बचावात्मक खेळण्याला अर्थ नसतो. त्यामुळे सामना जिंकता येत नाही.’स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व करणाºया चहलने सांगितले की, त्याला कोहली व यष्टिरक्षक धोनी यांनी उजव्या यष्टिबाहेर मारा करण्याचा सल्ला दिला होता.’ चहलने ११८ धावांची शतकी भागीदारी करणाºया हार्दिक पांड्या व महेंद्रसिंह धोनी यांचीही प्रशंसा केली.(वृत्तसंस्था)मी आयपीएलमध्ये मॅक्सवेलला बरीच गोलंदाजी केली आहे. आम्ही त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यास प्रयत्नशील होतो. आम्ही बचावात्मक खेळू शकत नाही. चेंडूची दिशा बदलणे महत्त्वाचे होते. त्याने जर चांगला फटका मारला तर चिंता नाही; पण चुकीचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला बाद करण्याची संधी होती.- यजुवेंद्र चहल