Join us  

बीसीसीआय सरकारकडे परवानगी मागणार

अंडर-१९ आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाच्या अधिकार गमावल्यानंतर बीसीसीआयने आशिया कप २०१८ च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी सरकारकडे परवानगी मागण्याचा निर्णय घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:08 AM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आक्षेप नोंदविल्यामुळे अंडर-१९ आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाच्या अधिकार गमावल्यानंतर बीसीसीआयने आशिया कप २०१८ च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी सरकारकडे परवानगी मागण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानही सहभागी होणार आहे.बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘आम्ही अंडर-१९ आशिया कप स्पर्धेसाठी सरकारला तीन महिन्यांपूर्वी पत्र लिहिले होते. आम्हाला कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे स्पर्धा मलेशियामध्ये स्थानांतरित करण्यात आली. आता सिनिअर स्पर्धेसाठी पुन्हा एकदा सरकारला पत्र देण्यात येणार आहे. कारण भारत व पाकिस्तान या संघांविना आशिया कप स्पर्धा अशक्य आहे’महिला विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाºया भारतीय महिला संघही राऊंड रॉबिन टप्प्यात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. अधिकारी पुढे म्हणाला,‘आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेप्रमाणे आशिया कप स्पर्धेतही अन्य संघही खेळतात आणि त्यात भारत-पाक संघांदरम्यान लढत होतेच. सुरुवातीला आशिया कप स्पर्धेचे आयोजन जून महिन्यात करण्यात येणार होते, पण आता वर्षांच्या दुसºया हाफमध्ये होईल. जून महिन्यात पावसाचा मोसम असतो. त्यामुळे स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर किंवा आॅक्टोबरमध्ये स्थानांतरित करण्याचे ठरले आहे. अंतिम तारखेबाबत घोषणा लवकरच करण्यात येईल.’गेल्या आठवड्यात श्रीलंकेत आशिया क्रिकेट परिषदेच्या झालेल्या बैठकीदरम्यान निर्णय घेण्यात आला की, अंडर-१९ आशिया कप स्पर्धा आता भारताबाहेर मलेशियामध्ये स्थानांतरित करण्यात येत आहे. त्याचे आयोजन आता नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. पाकिस्तानने सुरक्षा कारणांचा हवाला देत भारतात खेळण्यास नकार दिला. दरम्यान, श्रीलंकेने पाकिस्तानचा दौरा करण्यास सहमती दर्शवली आहे. २००९ मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठल्याही मोठ्या संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मलेशियामध्ये खेळल्या जाणाºया स्पर्धेत भारताचा अंडर-१९ संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना अधिकारी म्हणाला,‘आम्ही सरकारकडून स्वीकृती मिळण्याची तीन महिने प्रतीक्षा केली. कुठलाही दुजोरा न मिळाल्यामुळे एसीसीने स्पर्धा मलेशियामध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.’ (वृत्तसंस्था)।आशिया कप स्पर्धेत भारत-पाक लढत महत्त्वाची असते. जर ही लढत झाली नाही तर स्पर्धेत रंगत राहणार नाही.द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळायचे नाही. ही स्पर्धा म्हणजे आयसीसीच्या स्पर्धेप्रमाणे अनेक संघांचा सहभाग असलेली स्पर्धा आहे.’उभय देशांदरम्यान तणाव असला तरी भारत आणि पाकिस्तान विश्व स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळत असतात.अलीकडेच उभय संघांदरम्यान जून महिन्यात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत लढत झाली होती.