Join us  

आॅस्ट्रेलिया ‘क्लीन स्वीप’साठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध चौथी अ‍ॅशेस लढत आजपासून

मेलबोर्न : पहिल्या तीन लढतीत सरशी साधत अ‍ॅशेस मालिकेत विजयी आघाडी घेणारा आॅस्ट्रेलिया संघ आजपासून (मंगळवार) प्रारंभ होणाºया चौथ्या लढतीत (बॉक्सिंग डे कसोटी) विजय मोहीम कायम राखत क्लीन स्वीपची शक्यता कायम ठेवण्यास इच्छुक आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:48 AM

Open in App

मेलबोर्न : पहिल्या तीन लढतीत सरशी साधत अ‍ॅशेस मालिकेत विजयी आघाडी घेणारा आॅस्ट्रेलिया संघ आजपासून (मंगळवार) प्रारंभ होणा-या चौथ्या लढतीत (बॉक्सिंग डे कसोटी) विजय मोहीम कायम राखत क्लीन स्वीपची शक्यता कायम ठेवण्यास इच्छुक आहे तर इंग्लंड संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नशील राहील.जो रुटच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा दौरा चांगला ठरला नाही. त्यांना पहिल्या तीन कसोटीत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मेलबोर्न व सिडनी कसोटी सामन्यांना विशेष महत्त्व उरले नाही. इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर रुट टीकाकारांचे लक्ष्य ठरला आहे. माजी आॅस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने त्याला ‘छोटा मुलगा’ म्हटले आहे.आघाडीच्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी इंग्लंड संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. अ‍ॅलिस्टर कुक, स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अली संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना संघातून वगळण्याची मागणी होत आहे. संघातील सर्व खेळाडू मात्र कर्णधार व या खेळाडूंची पाठराखण करताना ड्रेसिंग रुममध्ये एकता असल्याचे सिद्ध केले आहे. या तिघांना संघात कायम ठेवले आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी केवळ एक बदल केला असून दुखापतग्रस्त क्रेग ओवरटनच्या स्थानी युवा वेगवान गोलंदाज टॉम कुरेनला संघात स्थान दिले आहे.याउलट आॅस्ट्रेलियन संघ शानदार फॉर्मात आहे. कर्णधार स्मिथने आयसीसी सर्वकालिक मानांकनामध्ये इंग्लंडच्या लेन हटनसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. आता त्याच्यापुढे केवळ महान डॉन ब्रॅडमन आहेत. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार आता मेलबोर्नमध्ये सलग चौथे कसोटी शतक झळकावण्यासाठी प्रयत्नशील राहील. (वृत्तसंस्था)