Join us  

भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाचेच पारडे जड, कारण मात्र विचारू नका - चॅपेल

सिडनी : भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 6:36 AM

Open in App

शिल्लक आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. दरम्यान आॅस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे भाकीत केले. यामागील कारण उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.

एका संकेतस्थळाशी बोलताना चॅपेल म्हणाले,‘माझा पाठिंबा आॅस्ट्रेलियाला असेल, मात्र याचे कारण विचारू नका. कारण द्यायचे झाल्यास , इंग्लंडमध्ये भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला ते पाहून मी खूप निराश झालो. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला जिंकण्याची चांगली संधी होती. सध्याचा भारतीय संघ हा सर्वोत्तम आहे. या जोरावर ते आॅस्ट्रेलियाला हरवू शकतील, पण अजूनही भारतीय संघात अनेक उणिवा जाणवत आहेत. याउलट आॅस्ट्रेलियाची गोलंदाजी हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहे. भारतीय गोलंदाजांनी अजूनपर्यंत आॅस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर दखल घेण्यासारखी कामगिरी केलेली नाही. यासाठीच माझा पाठिंबा आॅस्ट्रेलियाला असेल.’

त्याचवेळी, ‘विराट कोहली या मालिकेत चांगल्या धावा काढेल,’ असा विश्वास चॅपेल यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले,‘मला आॅस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज विरुद्ध विराट कोहली ही स्पर्धा पाहण्याची उत्सुकता आहे. ही स्पर्धा फारच उत्कंठापूर्ण होईल. मागच्या दौऱ्यात कोहलीने फार सुरेख खेळ केला होता.’‘भारतीय संघ कागदावर बलाढ्य’मागील १५ वर्षांत विदेश दौऱयात सध्याचा संघ सर्वोत्कृष्ट भारतीय संघ असल्याच्या रवी शास्त्री यांच्या वक्तव्यास चॅपेल यांनी दुजोरा दिला. यामागे अनेक कारणे असल्याचे सांगून चॅपेल म्हणाले,‘भारताकडे अनेक चांगले वेगवान गोलंदाज आहेत. कागदावर हा संघ बलाढ्य वाटतो पण मैदानावर त्यांची कामगिरी दमदार व्हायला हवी.’

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया