Join us  

विश्वचषक झाल्यास प्रेक्षकांना प्रवेश

विश्वचषकासाठी १५ संघांना प्रवेशाची परवानगी बहाल होत असेल तर प्रेक्षकांना सामना लाईव्ह पाहण्याचीदेखील परवानगी दिली जाऊ शकेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 1:58 AM

Open in App

मेलबोर्न : प्रवासबंदी उठल्यानंतर देशात टी-२० विश्वचषकाचे आयोजन झाल्यास प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्टीकरण क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे अंतरिम सीईओ निक हॉक्ले यांनी शनिवारी दिले. ‘विश्वचषकासाठी १५ संघांना प्रवेशाची परवानगी बहाल होत असेल तर प्रेक्षकांना सामना लाईव्ह पाहण्याचीदेखील परवानगी दिली जाऊ शकेल. तथापि आमच्यापुढे सर्वात मोठी समस्या १५ संघांचे आदारातिथ्य करण्याची आहे,’ असे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सीएची केविन रॉबर्टस् यांच्याकडून जबाबदारी स्वीकारणारे हॉक्ले यांनी सांगितले.विश्वचषकाच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा शोध घेण्यात येत असून त्यातला एक पर्याय रिकाम्या स्टेडियममध्ये सामना आयोजनाचा आहे. हॉक्ले यांनी मात्र प्रेक्षकांना परवानगी मिळू शकते, असे म्हटले आहे. खेळाडू, अधिकारी, सहयोगी स्टाफ यांच्यासह १५ संघांना देशात प्रवेश देणे सध्या तरी कठीण वाटत आहे. यामुळेच विश्वचषक स्थगित होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.प्रवेशबंदी उठली आणि १५ संघांना प्रवासाची परवानगी मिळाली तर प्रेक्षकांनादेखील प्रवेशाची मुभा मिळेल का, असे विचारताच हॉक्ले म्हणाले, ‘आम्ही हाच विचार करीत आहोत.’ टी-२० विश्वचषकाचे आयोजन १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात प्रस्तावित आहे. कोरोनामुळे मात्र आयोजनावर टांगती तलवार कायम आहे. (वृत्तसंस्था)>प्रेक्षकांविना विश्वचषक होईल का, असे विचारताच हॉक्ले म्हणाले, ‘अलीकडे आम्ही याचा शोध घेतला. आंतरराष्टÑीय प्रवासबंदी उठल्यास अधिक संख्येने प्रेक्षक येऊ शकतात. द्विपक्षीय दौºयात केवळ एका संघाचे आदरातिथ्य करावे लागते. १५ संघांना येथे आणणे शिवाय सहा-सात संघ एकाच शहरात वास्तव्यास असणे फारच कठीण वाटत आहे.’