Join us  

आश्विनचा दर्जा अन्य गोलंदाजांच्या तुलनेत वरचा : वृद्धिमान साहा

श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणा-या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:56 AM

Open in App

कोलकाता : श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणा-या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सांगितले.१६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या पहिल्या सराव सत्रानंतर बोलताना साहा म्हणाला, ‘आम्ही अद्याप खेळपट्टी बघितलेली नाही; पण पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे मालिकेत लय मिळवता येते.’भारतीय संघाची नजर सध्याच दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणा-या मालिकेवर नाही. ही मालिका ६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. भारतीय संघ एकावेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे साहाने सांगितले.साहा म्हणाला, ‘प्रत्येक लढतीत वेगळे आव्हान असते आणि लढत महत्त्वाचीही असते. आम्ही एका वेळी एकच लढतीवर लक्ष देतो. आम्ही येथे चांगली कामगिरी केली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेबाबत विचार करू.’अन्य फिरकीपटूंच्या तुलनेत रविचंद्रन आश्विनला वरचे मानांकन देणाºया साहाने फिरकीपटूंविरुद्ध यष्टिरक्षण करणे आव्हान असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता असते.साहा पुढे म्हणाला, ‘आश्विनचा दर्जा अन्य गोलंदाजांच्या तुलनेत वरचा आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. याव्यतिरिक्त त्याच्या चेंडूचा टप्पाही वेगळा असतो. रवींद्र जडेजा व कुलदीप यादवच्या तुलनेत त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. आम्ही रणजी, भारत ‘अ’ आणि सरावादरम्यान अनेक सामने खेळले. जेवढे अधिक यष्टिरक्षण कराल तेवढी अधिक माहिती मिळते. मी आपल्या २८ कसोटी सामन्यांपासून त्यांच्यासोबत खेळत आहे.’ भारताने तीन फिरकीपटू आश्विन, जडेजा व कुलदीप यादव यांची संघात निवड केली आहे.भारतीय संघ तीन फिरकीपटूंना संधी देणार का, याबाबत बोलताना साहा म्हणाला, ‘याचा निर्णय खेळपट्टी बघितल्यानंतर होईल. कुठला गोलंदाज या खेळपट्टीवर उपयुक्त ठरेल, याबाबत विचार करावा लागेल.’ स्विंग गोलंदाज उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या गोलंदाजीच्या वेळी यष्टिरक्षण करताना अधिक अडचणी भासत नाहीत.कुणीही फिडबॅक देऊ शकते, असा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. विराट बरेच वेळा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे मी त्याला आपला सल्ला देत असतो; पण अखेर निर्णय हा कर्णधारालाच घ्यावा लागतो. डीआरएसबाबतही याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो.’ (वृत्तसंस्था)भारतीय खेळाडूंनी रिव्हर्स स्वीप, शॉर्ट चेंडूंचा केला सराव-श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करणाºया भारतीय संघाने आज येथे ट्रेनिंग सत्रादरम्यान शॉर्ट चेंडू आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध रिव्हर्स स्वीप खेळण्याचा सराव केला.भारतीय सपोर्टिंग स्टाफ अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीसारख्या फलंदाजांना शॉर्ट पिच चेंडूंसाठी थ्रोडाऊन करताना दिसले. संघाने १६ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्समध्ये सुरू होणाºया पहिल्या कसोटीआधी सराव सत्रात सहभाग घेतला.रहाणेने सर्वांत जास्त जवळपास अर्ध्या तासापर्यंत थ्रोडाऊनचा सामना केला. त्याने प्रदीर्घ वेळेपर्यंत आखूड टप्प्याच्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव केला. त्याचा हा सराव म्हणजे दोन महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिका दौºयादरम्यान भारतीय संघाला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो हे त्याचे संकेत आहेत.नेटमध्ये भारतीय संघाने आपल्या फलंदाजी क्रमानुसार सराव केला. राहुल आणि धवन सर्वांत आधी फलंदाजीस आले आणि त्यांनी फिरकी व वेगवान गोलंदाजीचा सामना केला.राहुल आणि धवन यांनी मुख्यत्वे कव्हर्समध्ये फटके मारले आणि काही वेळेस रिव्हर्स स्विपचे फटके खेळले. तथापि, रहाणे याने रविचंद्रन आश्विन आणि कुलदीपसारख्या गोलंदाजांविरुद्ध अपारंपरिक फटके मारले. त्यामुळे श्रीलंकेच्या रंगना हेराथ आणि लक्षण संदाकन सारख्यांविरुद्ध भारतीय व्यूहरचनेचा अंदाज लावलाजाऊ शकतो.येथे पोहोचल्यानंतर कोहलीने अडीच तास सराव केला आणि सरावादरम्यान तो पूर्ण लयीत दिसला. त्याने ड्रिल्सने सुरुवात केली. त्यानंतर त्याने थ्रोडाऊन आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना केला आणि पुन्हा नेट्सवर पोहोचला.

टॅग्स :वृद्धिमान साहाक्रिकेट