Join us  

नेपाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट चमूचे तळेगावात आगमन; खेळणार टी२० सामने

तीन दिवस खेळणार राॅयल संघासोबत टी २० क्रिकेट सामने

By अभिनय खोपडे | Published: October 10, 2023 11:48 PM

Open in App

अभिनय खोपडे, वर्धा: तळेगाव (शा.पं.)  येथील राजस्थान रॉयल अकाडमीच्या एम.एस.डी.७ स्टेडीयमवर १० ते १२ आक्टोंबर दरम्यान आंतरराष्ट्रिय क्रिकेट टिम नेपाळ व राॅयल अकाडमी यांच्यात तीन सामन्याच्या फ्रेंडशीप मालिका खेळवली जात आहे.

आजपासुन खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन  संदीप काळे, रोमी भिंडर, डाॅ. निता अढाऊ यांच्या हस्ते झाले असुन सामन्याला सुरुवात झाली. आज खेळल्या खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यामध्ये नेपाळ संघाने प्रथम  फलंदाजी करुन राॅयल अकाॅडमी संघासमोर  एकूण २१६ धावांचे लक्ष ठेवले होते. यामध्ये नेपाळ संघाच्या  एम. डी.ताहा या खेळाडूने अवघ्या २८ चेंडूत ६० धावा काढल्या.तर अभिषेक याने ४२ चेंडूत ५५ धावा काढल्या. २१६ धावांचा पाठलाग करीत राॅयल अकॅाडमी  संघ १८२ धावा काढून  ऑल आऊट झाला. यामध्ये राॅयल अकाॅडमी संघाचा खेळाडू कौशल याने ३९ चेंडूत  ६८ धावा काढून स्पर्धे मध्ये चुरस निर्माण केली होती.कौशल हा  खेळाडू बाद होताच संपूर्ण संघ १८१ धावा काढून बाद झाला. या सामन्याचे नियोजन राजस्थान रॉयल्स चे मॅनेजर रोमी भिंडर यांनी केले.या समण्या करिता आष्टी येथील तहसीलदार सचिन कुमावत,तसेच डॉक्टर हेमंत ठाकरे यांचे हस्ते विजेत्या नेपाळ संघाच्या खेळाडूला ऑरेंज कॅप देवून गौरविण्यात आले.

भारताचा फलदांज युवराजसिंह यांचा रेकार्ड तोडनारा फलदांज खेळत आहे तळेगावात आशियाई क्रीडा स्पर्धेत युवराज सिंह याचा सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडला आहे. नेपाळ आणि मंगोलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात युवराज आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडीत निघालाय.

नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंह ऐरी हा तळेगाव येथील राॅयल एक्याडमीच्या ग्राऊंड खेळत असुन त्याने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. युवराजने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पण आता नेपाळच्या दीपेंद्र याने आशोया क्रिडा स्पर्धेत फक्त 9 चेंडूत अर्धशतक करत नवा रेकॉर्ड केला आहे. तर आजच्या सामन्यात त्याने१५ चेंडुत ३६ धावा काढुन तो बाद झाला.

टॅग्स :तळेगाव दाभाडे पोलीस