Join us  

Ajit wadekar : 'तो' विनोद कांबळीचा आरोप वाडेकर यांच्या जिव्हारी लागला होता

अजित वाडेकर आणि विनोद कांबळी यांचे नाते फक्त संघाचे व्यवस्थापक आणि खेळाडू असे नव्हते, तर त्यांच्यामध्ये पिता-पुत्राचे नाते होते.

By प्रसाद लाड | Published: August 16, 2018 7:44 AM

Open in App

अजित वाडेकर आणि विनोद कांबळी यांचे नाते फक्त संघाचे व्यवस्थापक आणि खेळाडू असे नव्हते, तर त्यांच्यामध्ये पिता-पुत्राचे नाते होते. पण कांबळीने जेव्हा एक मोठा आरोप केला तेव्हा त्याला खडे बोल सूनवायला वाडेकर यांनी कमी केले नव्हते. कारण कांबळीने केलेला आरोप वाडेकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. भारताला 1996 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरी पराभव पत्करावा लागला होता. कांबळी त्या सामन्यात रडला होता, हे साऱ्यांनीच पाहिले होते. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताचा डाव गडगडत होता. त्यावेळी ईडन गार्डन्सवरील प्रेक्षकांनी मैदानाची नासधूस करायला सुरुवात केली आणि सामना थांबवण्यात आला होता. त्यावेळी कांबळी रडत रडत मैदानबाहेर पडत होता. कांबळीने 2011 साली तो सामना फीक्स होता, असा आरोप केला होता. यावेळी त्याने वाडेकर यांना या सर्व गोष्टी माहिती होत्या, असेही म्हटले होते. वाडेकर यांना कांबळीचे हे वक्तव्य पटले नाही. ते नाराज झाले आणि त्यांनी कांबळीची खरडपट्टी काढली होती.वाडेकर त्यावेळी म्हणाले होते की, " कांबळी जे आरोप करत आहे, ते बिनबुडाचे आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. असे आरोप कांबळी करूच कसे शकतो. कोणतीही गोष्ट बोलताना आपण भानावर असायला हवे. जर कांबळीला हे त्यावेळीच माहिती होते, तर त्याने आता 2011 साली हे आरोप का करावेत? आतापर्यंत तो कशासाठी थांबला होता. "

टॅग्स :अजित वाडेकरक्रिकेट