Join us  

‘त्या’ खेळाडूंवर कारवाई व्हावी - अखिल कुमार

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ब-याच प्रशिक्षकांच्या नावाची शिफारस करणा-या खेळाडूंवर कारवाई व्हावी, असे मत आॅलिम्पियन तसेच स्टार बॉक्सर अखिल कुमार याने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:02 AM

Open in App

नवी दिल्ली : द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ब-याच प्रशिक्षकांच्या नावाची शिफारस करणा-या खेळाडूंवर कारवाई व्हावी, असे मत आॅलिम्पियन तसेच स्टार बॉक्सर अखिल कुमार याने व्यक्त केले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असलेले अर्जुन, द्रोणाचार्य आणि राजीव गांधी खेलरत्न हे बºयाच वर्षांपासून वादात अडकले आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेचा कांस्यपदक विजेत्या अखिल याने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याचे आवाहन केले आहे.एका वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, ‘व्यवस्थेला स्वच्छ करण्यासाठी दोन उपाय आहेत. नम्रतेने प्रयत्न करू शकता किंवा हे यशस्वी ठरत नसेल तर दंडात्मक कारवाई करू शकता. निलंबनाची व्यवस्था असेल तर त्याचा अधिक परिणाम दिसून येईल. एक खेळाडू द्रोणाचार्य पुरस्कारासाठी एकाहून जास्त प्रशिक्षकांची शिफारस करतात हे ऐकून मला आश्चर्य वाटते. गुरु हा एकच असतो. असे प्रकार करणाºयांवर कारवाई व्हावी.’ अखिलने यासंदर्भात एका महिला मुष्ठियोद्ध्याचे उदाहरण दिले. ज्यात तीन अर्जुन विजेत्या (एमसी मेरीकोम, सरजूबाला देवी आणि सरिता देवी) खेळाडूंचा समावेश असून एकूण पाच द्रोणाचार्य पुरस्कारांचा समावेश आहे.‘माझेच उदाहरण घ्या. मला माहीत नाही की, माझ्या नावाचा वापर करीत किती जणांनी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. मी त्यांच्याकडून प्रशिक्षणही घेतले नसावे. जर मी एखाद्यासोबत बॉक्सिंगवर चर्चा करीत असेल तर तो माझा गुरु होत नाही. महिला मुष्ठियोद्धांनाच बघा. ती अर्जुन पुरस्कार विजेते आहेत आणि पाच द्रोणाचार्य प्राप्त करणारे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रक्रिया मोडून काढायला हवी,’ असा सल्लाही अखिल कुमारने क्रीडा मंत्रालयाला दिला.त्याचप्रमाणे राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वाद उद्भवतो. हा वाद टाळण्यासाठी या पुरस्काराची सर्व प्रक्रिया आॅनलाइन करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी अखिल कुमारने केली.