सतर्क राहा, तगडा संघ भारतात येतोय; इंग्लंडच्या माजी खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

शुबमन गिलची सॉलिड सुरुवात, चेतेश्वर पुजाराची अभेद्य भींत आणि रिषभ पंतची फटकेबाजी यानं टीम इंडियानं हा सामना जिंकला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 09:47 AM2021-01-20T09:47:06+5:302021-01-20T09:47:35+5:30

whatsapp join usJoin us
Kevin Pietersen warns Team India in Hindi ahead of England Test series | सतर्क राहा, तगडा संघ भारतात येतोय; इंग्लंडच्या माजी खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

सतर्क राहा, तगडा संघ भारतात येतोय; इंग्लंडच्या माजी खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मंगळवारी गॅबावर ऐतिहासिक विजय मिळवला. भारतानं ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलची सॉलिड सुरुवात, चेतेश्वर पुजाराची अभेद्य भींत आणि रिषभ पंतची फटकेबाजी यानं टीम इंडियानं हा सामना जिंकला. या विजयाचे वर्णन नेमक्या कोणत्या शब्दात करावं, हे अजूनही कुणाला सुचत नाही, असा हा विजय होता. आता भारत मायदेशात परतणार असून घरच्या मैदानावर त्यांना इंग्लंडचा ( India vs England) सामना करावा लागणार आहे. ५ फेब्रुवारीपासून भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच आता वातावरण तापू लागलं आहे आणि इंग्लंडचा माजी कसोटीपटू केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) यानं टीम इंडियाचे अभिनंदन करताना त्यांना पुढील आव्हानासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ( England tour of India) 

पीटरसननं यापूर्वी अनेकदा हिंदीतून ट्विटकरून भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. केपीनं हिंदी शिकली आहे आणि ब्रिस्बनवरील विजयानंतर त्यानं खास हिंदीत ट्विट केले. त्यानं टीम इंडियाचं कौतुक केलं. त्यानं लिहिलं की,''  अनेक अडचणींचा सामना करून तुम्ही हा विजय मिळवला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झालाच पाहिजे. पण, खरा संघ काही आठवड्यात येत आहे आणि तुम्हाला त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करायचे आहे. सतर्क राहा, दोन आठवड्यांत अधिक जल्लोष साजरा करण्यापासून सावधान राहा.''

हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड
 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केल्यानंतर भारतीय संघाला ५ फेब्रुवारीपासून  इंग्लडविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने १८  खेळाडूंचा संघ मंगळवारी जाहीर केला.

भारतीय संघ - सलामीवीर : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल, यष्टीरक्षक : ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, अष्टपैलू : हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, फिरकीपटू : आर. अश्विन, कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार, राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.   

भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक ( India vs England Full Time Table) 
कसोटी मालिका
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद
टी-२० (सर्व सामने अहमदाबाद)
 १) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०
वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे

Web Title: Kevin Pietersen warns Team India in Hindi ahead of England Test series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.