Is Jos Buttler replacing Steve Smith as RR captain? Here's what Rajasthan Royals said | राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार; स्टीव्ह स्मिथकडील नेतृत्व जोस बटलरकडे जाणार?

राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार; स्टीव्ह स्मिथकडील नेतृत्व जोस बटलरकडे जाणार?

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाला अपयश आले आहे. ८ सामन्यांत ३ विजयांसह ६ गुणांची कमाई करताना RR गुणतक्त्यात सातव्या स्थानी आहे. त्यांनी काही सामने तर हातचे घालवले आणि त्यामुळेच Play Offच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता सर्व सामने जिंकावे लागतील. अशात RRनं शुक्रवारी केलेल्या एका ट्विटनं नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

योगायोग असा की कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार दिनेश कार्तिकनंही नेतृत्वाची जबाबदारी आजच सोडली आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याच्याकडे सोपवली. त्यामुळे RRच्या आजच्या ट्विटनं स्मिथकडून नेतृत्व जोस बटलरकडे जाण्याची चर्चा सुरू झाली. स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थाननं सलग दोन विजयासह IPL 2020त सुरुवात केली, परंतु त्यांची गाडी नंतर घसरली. शुक्रवारी समालोचक हर्षा भोगले याच्या ट्विटनंही चाहत्यांच्या भूवया उंचावल्या. भोगलेनं RRचे

कर्णधारपद स्मिथकडून जोस बटलरकडे सोपवावे असा सल्ला दिला. त्यानं ते ट्विट नंतर डिलिट केलं.


भोगलेचं ट्विट हे RRच्या ट्विटला धरूनच होते. या संदर्भात RRने स्पष्टीकरण दिले की, तो एक रँडम ट्विट आहे.  

RRचे CEO जॅक ल्यूश मॅक्क्रम यांनी सांगितले की,या अफवा कोणी फसरवल्या आणि फ्रँचायझी बटलरला कर्णधार बनवण्याचा विचार करत नाही. 

राजस्थान रॉयल्सनंही त्यांच्या आधिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.


 राजस्थान रॉयल्सचे उर्वरित सामने 
17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 ऑक्टोबर, गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
30 ऑक्टोबर, शुक्रवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Is Jos Buttler replacing Steve Smith as RR captain? Here's what Rajasthan Royals said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.