IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् CSKवर टीका करणं चुकीचं; पण...

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी CSKला दोन मोठे धक्के बसले आणि त्यातून त्यांना सावरताच आला नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: October 24, 2020 07:45 AM2020-10-24T07:45:00+5:302020-10-24T07:45:02+5:30

whatsapp join usJoin us
It is not fair to criticize on MS Dhoni and CSK; Chennai gear up for IPL 2021 Auction, what they need to do? | IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् CSKवर टीका करणं चुकीचं; पण...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् CSKवर टीका करणं चुकीचं; पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर

आजचं मरण उद्यावर ढकलत ढकलत इथवर पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) प्रथमच इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं. २०१०मध्येही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची अशी अवस्था झाली होती, परंतु त्यांनी दुसऱ्या टप्प्यात करिष्मा दाखवला अन् थेट जेतेपद पटकावलं. त्यामुळे २०२०मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भाबडी आशा CSKच्या फॅन्सना होती. पण, ते शक्य नाही, हे कुठेतरी त्यांनाही माहीत होतं. २०१० आणि २०२०च्या संघातील खेळाडूंच्या वय यातला फरक. त्यामुळे 'अनहोनी को होनी', करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही ( MS Dhoni) यंदा तो करिष्मा करता आला नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी CSKला दोन मोठे धक्के बसले आणि त्यातून त्यांना सावरताच आला नाही. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे CSKचे हात दगडाखाली अडकल्यासारखे झाले. कारण, लीगच्या आतापर्यंच्या प्रवासात धोनीला या खेळाडूंचा सक्षम पर्याय सापडलाच नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धची पहिली लढत जिंकून CSKच्या खेळाडूंचं मनोबल उंचावले असे वाटले होते, परंतु दुसऱ्या सामन्यापासून त्यांची गाडी रुळावरून घसरली ती घसरलीच. शेव वॉटसन, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो, फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, मुरली विजय, केदार जाधव, पीयूष चावला आणि स्वतः धोनी, याचं वय लक्षात घेता ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये त्यांचा कस लागणे साहजिकच होते. ( फॅफ ड्यू प्लेसिसचा अपवाद वगळता).

संघात ऋतुराज गायकवाड, नारायण जगदीशन, के एम आसीफ, मोनू कुमार, आर साई किशोर या युवा खेळाडूंचा पर्याय होता, परंतु यापैकी सुरेश रैना व हरभजन यांची उणीव भरून कुणी काढेल, असा 'Spark' त्यांच्यात नव्हता हेही तितके खरे. अशात आहे त्या डॅडी आर्मीसोबत संयुक्त अरब अमिरातीच्या ( UAE) घाम काढणाऱ्या गर्मीत खेळण्याशिवाय धोनीकडे पर्याय नव्हता. जोगिंदर शर्मा सारख्या गोलंदाजाकडे ट्वेंटी-20 वर्ल्डकपचे अखेरचे षटक सोपवण्याचा विश्वास दाखवणाऱ्या धोनीला CSKच्या ताफ्यात असा एकही विश्वासाचा युवा खेळाडू सापडला नाही, हेही तितकेच खरे. धोनीनं त्याची ही व्यथा बोलून दाखवली आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीका केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच युवा खेळाडूंनी काय चमत्कार दाखवला, ते सर्वांनी पाहिलं. आता उर्वरित तीन सामन्यांत धोनी अन्य युवा खेळाडूंना संधी देणार आहे. त्यानंतर IPL 2021साठीची रणनिती ठरवली जाईल, हे त्यानं स्पष्ट केलं.

इंडियन प्रीमिअर लीग म्हटली की धोनीचा CSK संघ जेतेपदाच्या शर्यतीत नेहमी आघाडीवर असलाच पाहिजे, हा हट्ट मुळाच चुकीचा आहे. चेन्नईनं आयपीएलच्या १० मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यापैकी २०१०, २०११ व २०१८ मध्ये तर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशा यशस्वी संघाला २०२०मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं, हे धक्कादायक आहे. पण, म्हणून लगेच महेंद्रसिंग धोनी आणि CSKवर टीका करणे योग्य नाही...

CSKच्या संघातील उणीवा...

खेळाडूंचं वय - चेन्नईच्या संघातील बहुतेक खेळाडू पत्तीशीच्या वर किंवा आसपासचे आहेत. त्यात त्यांच्या फलंदाजीच्या शैलीत विविधता नाही किंवा फटक्यांत नैपुण्य नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे एबी डिव्हिलियर्ससारखा Mr 360 खेळाडू CSKकडे नाही. फॅफ ड्यू प्लेसिसनं तंदुरुस्ती राखत संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु एकाच्या जीवावर टीम जिंकत नाही.

गोलंदाजीत सक्षम पर्याय नाही- दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर या भारतीय गोलंदाजांवरच धोनी कायम राहिला. जोश हेझलवूड व लुंगी एन गिडी यांना अनुक्रमे ३ व २ सामने खेळवले गेले. 

अष्टपैलू खेळाडू नेमका कोण? 
ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू संघात होते. यापैकी जडेजा सोडला तर दोघांनी निराश केले. ब्राव्हो पूर्णपणे फिट नसूनही संघात जागा अडवून होता. केदार जाधवचा संघातील नेमका रोल काय, हेच त्याला माहीत नव्हते. 

पीयूष चावलाची नेमकी काय जबाबदारी? 
पीयूष चावलाला मोठी रक्कम घेऊन ताफ्यात घेतले, परंतु त्यालाही आपली छाप पाडता आलेली नाही. कर्ण शर्माला हवी तेवढी संधी मिळाली नाही आणि इम्रान ताहीर ( १ सामना) व मिचेल सँटनर बाकावर बसूनच राहिला. पुन्हा चारच परदेशी खेळाडूंचा नियम असल्यानं धोनीकडेही दुसरा पर्याय नव्हताच. फॅफ, वॉटसन, ब्राव्हो आणि सॅम कुरन यांनी ती जागा फिक्स केली होती. 

यंदाच्या आयपीएलमधील पॉझिटिव्ह गोष्ट
चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाच्या आयपीएलमधील एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सॅम कुरन. त्यानं फलंदाजी व गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावली. ११ सामन्यांत १७३ धावा व १० विकेट्स त्याने घेतल्या. विशेष म्हणजे फलंदाजीत तो सलामीपासून सहाव्या क्रमांकापर्यंत कुठेही फिट बसत होता. 


आयपीएल २०२१च्या तयारीला आतापासूनच सुरुवात
स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे धोनी आता उर्वरित तीन सामन्यांत प्रयोग करेल हे नक्की. त्यात युवा खेळाडूंना संधी देणार असल्याचे धोनीनं सांगितले. त्यामुळे आता हे तीन सामने पुढील आयपीएलच्या आखणीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्यातून कोणत्या खेळाडूमध्ये स्पार्क आहे, याची चाचपणी होईल.

IPL 2021 ऑक्शनसाठी CSK कोणाला रिलीज करतील?
शेन वॉटसन, मुरली विजय, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, पीयूष चावला, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो

कोणाला कायम ठेवतील?
महेंद्रसिंग धोनी ( कदाचित मेंटॉरच्या भूमिकेत), दीपक चहर, फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, मिचेल सँटनर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड, सॅम कुरन 

काय असतील आव्हानं?
सुरेश रैना, ब्राव्हो, वॉटसन यांना सक्षम पर्याय शोधणे. पुन्हा नव्यानं संघबांधणी करणे.

Web Title: It is not fair to criticize on MS Dhoni and CSK; Chennai gear up for IPL 2021 Auction, what they need to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.