IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

IPL 2020: 2019च्या आयपीएल फायनलमध्येही पोटरीतून रक्त येत असूनही वॉटसन CSKला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर खिंड लढवली होती.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 03:54 PM2020-09-27T15:54:07+5:302020-09-27T15:54:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Shane Watson Played CSK's Match Against DC Despite Grandmother's Death Two Days Earlier | IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) हा सलग दुसरा विजय असून त्यांनू IPL Point Table ( गुणतक्त्यात) 4 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना चेन्नई सुपर किंग्सकडूCSKने 20 षटकांत 7 बाद 131 धावा करता आल्या. पण, या सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी CSKचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन ( Shane Watson) याच्या आजीचं निधन झालं, तरीही ते दुःख विसरून त्यानं आपले संघासाठीचे कर्तव्य बजावले. 

मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान

त्यानं सांगितलं की,''माझी आजी ( आईची आई) हिचं बुधवारी निधन झालं. माझ्या घरच्यांप्रती इथूनच प्रेम व्यक्त करतो. माझ्या आजीनं किती प्रेमानं माझ्या आईला वाढवलं, हे मी ऐकलंय. तिच्या जाण्यानं कुटुंबियांवर किती दुःख ओढावले असेल याची मला कल्पना आहे आणि माझ्या मनातही त्या वेदना आहेत. या समयी त्यांच्यासोबत नसल्याचं मला दुःख होतंय आणि त्यासाठी मी त्यांची माफी मागतो.'' दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसननं 14 चेंडूंत 16 धावा केल्या होत्या.  

चेन्नई सुपर किंग्सची आतापर्यंतची कामगिरी
 

MI vs CSK 
सौरभ तिवारीच्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 9 बाद 162 धावा उभारल्या, परंतु तिवारीच्या दमदार खेळीचा शेवट फॅफ डू प्लेसिसच्या अप्रतिम झेलनं केला. सीमारेषेवर फॅफनं अफलातून झेल टिपला आणि सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर अंबाती रायुडूनं अर्धशतकी खेळी करताना CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

RR vs CSK
शारजात झालेल्या पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) चे वादळ घोंगावले आणि CSKच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. राजस्थान रॉयल्सनं 7 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला आणि हे लक्ष्य पेलवण्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ अपयशी ठरला. CSKला 6 बाद 200 धावा करता आल्या. या सामन्यात MS Dhoni 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानं टीका झाली. अंबाती रायुडूला दुखापतीमुळे या सामन्यात मुकावे लागले.

DC vs CSK 
चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) सलग दुसऱ्या पराभावाचा, तर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. CSK फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरले. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी CSKच्या गोलंदाजांची धुलाई केली. 3 बाद 175 धावांचा पाठलाग करताना CSKला 7 बाद 131 धावाच करता आल्या. DCने सांघिक खेळ करत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली. 

जाणून घ्या गुणतक्त्यात कितव्या स्थानी


 

 

Web Title: IPL 2020: Shane Watson Played CSK's Match Against DC Despite Grandmother's Death Two Days Earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.