ipl 2020 CSK VS SRH faf du plessis takes superb catch to dismiss David Warner | VIDEO: ड्युप्लेसीसनं सीमारेषेवर जबरदस्त झेल घेतला; हैदराबादचा डगआऊट पाहतच राहिला

VIDEO: ड्युप्लेसीसनं सीमारेषेवर जबरदस्त झेल घेतला; हैदराबादचा डगआऊट पाहतच राहिला

दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होत आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत आतापर्यंत ६ आयपीएल सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे धोनीच्या संघासमोर खडतर आव्हान आहे. त्यातच संघ गुणतालिकेत तळाला असल्यानं विजय आवश्यक आहे.

पहिल्याच षटकात दीपक चहरनं जॉनी बेरिस्टोचा त्रिफळा उडवत शानदार सुरुवात केली. बेरिस्टोला भोपळादेखील फोडता आला नाही. बेरिस्टो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मनिष पांडेनं डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ दिली. मात्र आज संधी मिळालेल्या चेन्नईच्या शार्दुल ठाकूरनं पांडेला २९ धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.

अकरावं षटक चेन्नईसाठी महत्त्वाचं ठरलं. पियूष चावलानं टाकलेल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला. फॅफ ड्युप्लेसीसनं सीमारेषेवर अतिशय सुंदर झेल घेतला. झेल घेताच ड्युप्लेसीसचा तोल गेला. मात्र सीमारेषेबाहेर जाताना त्यानं चेंडू हवेत उडवला आणि पुन्हा मैदानात येत तो झेलला. ड्युप्लेसीसचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहून हैदराबादचे खेळाडू थक्कच झाले. हैदराबादच्या डगआऊटच्या अगदी जवळच ड्युप्लेसीसनं झेल टिपला.

पाहा फॅफ ड्युप्लॅसीसचा शानदार झेल- https://www.iplt20.com/video/211210/watch-jump-catch-faf-special

फॅफ ड्युप्लेसीसनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातदेखील असाच झेल घेतला होता. ड्युप्लेसीसच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे सौरभ तिवारीला माघारी परतावं लागलं. या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. मात्र यानंतरच्या दोन्ही सामन्यांत चेन्नईचा संघ पराभूत झाला. त्यामुळे चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2020 CSK VS SRH faf du plessis takes superb catch to dismiss David Warner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.