अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा

India Vs England 2021: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

By कुणाल गवाणकर | Published: January 19, 2021 07:23 PM2021-01-19T19:23:10+5:302021-01-19T19:34:09+5:30

whatsapp join usJoin us
India Vs England 2021 Virat Kohli Ishant Sharma hardik pandya back for England test | अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा

अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करतील. याशिवाय अक्षर पटेललादेखील संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या टी. नटराजनची निवड करण्यात आलेली नाही.

मुख्य संघासोबतच चार अन्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये के. एस. भरत (यष्टिरक्षक), अभिमन्य ईश्वरन, शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांच्या नावांचा समावेश आहे. मुख्य संघातील खेळाडूंना दुखापत झाल्यास या चार खेळाडूंचा विचार होईल. याशिवाय नेट गोलंदाज म्हणून अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम आणि सौरभ कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड करण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीचे चार सदस्य उपस्थित होते. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण चार कसोटी सामने होतील. पहिला सामना ५ फेब्रुवारीला चेन्नईत खेळवला जाईल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघ- 
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, के.एल. राहुल, आर. अश्विन, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

Web Title: India Vs England 2021 Virat Kohli Ishant Sharma hardik pandya back for England test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.