India vs Australia : Ravindra Jadeja's 44* is now the highest T20I score for India by any player batting at No.7 or lower  | India vs Australia : रवींद्र जडेजा सुसाट... मोडला महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम

India vs Australia : रवींद्र जडेजा सुसाट... मोडला महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ केली आणि रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून  टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जडेजानं २३ चेंडूंत नाबाद ४४ धावा करताना महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम मोडला. 


प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia : Ravindra Jadeja's 44* is now the highest T20I score for India by any player batting at No.7 or lower 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.