India vs Australia : लोकेश राहुल अन् रवींद्र जडेजाची फटकेबाजी; ऑसी गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे शिलेदार फेल

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ करताना टीम इंडियासाठी खिंड लढवली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 4, 2020 03:27 PM2020-12-04T15:27:52+5:302020-12-04T15:28:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: India finish with 7-161 after a late flurry from Ravindra Jadeja, KL Rahul Half century | India vs Australia : लोकेश राहुल अन् रवींद्र जडेजाची फटकेबाजी; ऑसी गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे शिलेदार फेल

India vs Australia : लोकेश राहुल अन् रवींद्र जडेजाची फटकेबाजी; ऑसी गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे शिलेदार फेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसंजू सॅमसन, मनीष पांडे, शिखर धवन, विराट कोहली अपयशीलोकेश राहुलचे अर्धशतक अन् रवींद्र जडेजाच्या नावार ४४ धावा

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ करताना टीम इंडियासाठी खिंड लढवली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑसी गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवताना टीम इंडियाच्या धावांवर लगाम लगावला. अखेरच्या षटकांत जडेजानं ऑसींची धुलाई केली. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीच्या जोडीला केवळ ११ धावाच जोडता आल्या. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या अफलातून यॉर्करनं गब्बरचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन ( १) माघारी परतला. त्यानंतर सातव्या षटकात मिचेल स्वेप्सननं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. स्वेप्सननं स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा ( ९) झेल टिपला. लोकेश राहुलनं ३७ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 तील १२वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं आजच्या खेळीसह एका विक्रमाला गवसणी घालताना विराट कोहलीशी बरोबरी केली. 

जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरले. संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फलंदाज आज भारताच्या लाईनअपमध्ये आहेत. मोहम्मद शमी, टी नटराजन व दीपक चहर हे ३ जलदगती गोलंदाज असतील. लोकेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या. त्यान ३९ डावांतमध्ये हा पल्ला गाठला आणि विराट कोहलीसह बाबार आझम, अॅरोन फिंच यांनीही ३९ डावांत १५०० धावा पूर्ण केल्या होत्या.   

संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. भारताला ८६ धावांवर तिसरा धक्का बसला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. मोइजेस हेन्रीक्सनं ऑस्ट्रेलियासाठी मोठी विकेट घेतली. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. ९२ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या. 

Web Title: India vs Australia: India finish with 7-161 after a late flurry from Ravindra Jadeja, KL Rahul Half century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.