India vs Australia : Concussion Substitute Yuzvendra Chahal gets the two wicket for India, hardik & Sanju take brilliant catch, Video | India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलचे ऑसींना धक्के; हार्दिक-संजू यांनी टिपले अफलातून झेल, Video

India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलचे ऑसींना धक्के; हार्दिक-संजू यांनी टिपले अफलातून झेल, Video

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ केली आणि रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून  टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला येऊ शकला नाही. मात्र, त्याच्या बदल्यात मैदानावर आलेल्या युजवेंद्र चहलनं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांनी अफलातून झेल घेताना टीम इंडियाला हे यश मिळवून दिले. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.

दरम्यान, सामन्याच्या अखेरच्या षटकात जडेजाच्या हेल्मेटला चेंडू आदळला आणि आयसीसीच्या नियमानुसार खेळाडू मैदानावर जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानावर उतरू शकतो. तो गोलंदाजी किंवा फलंदाजीही करू शकतो. या नियमानुसार चहल आता गोलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 

अॅरोन फिंच आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दीपक चहरनं टाकलेल्या ७ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन झेल सुटले, मनीष पांडे व विराट कोहली यांच्याकडून हे जीवदान मिळाले. पण, जडेजाच्या जागी मैदानावर आलेल्या युजवेंद्र चहलनं त्याच्या पहिल्याच षटकात ऑसींना धक्का दिला. हार्दिक पांड्यानं अफलातून झेल घेत ३५ धावा करणाऱ्या फिंचला माघारी जाण्यास भाग पाडले. चहलनं पुढच्याच षटकात स्टीव्हन स्मिथला बाद करून ऑसींना मोठा धक्का दिला. संजू सॅमसननं यावेळी सुरेख झेल टिपला. ग्लेन मॅक्सवेलला पायचीत करून टी नटराजननं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. 

पाहा व्हिडीओ... 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia : Concussion Substitute Yuzvendra Chahal gets the two wicket for India, hardik & Sanju take brilliant catch, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.