India vs Australia, 4th Test : अजिंक्य रहाणेनं रचलेल्या सापळ्यात स्टीव्ह स्मिथ अडकला, पाहा वॉशिंग्टन सुंदरची पहिली विकेट 

India vs Australia, 4th Test Day 1 : हाताशी असलेल्या खेळाडूंमधून अंतिम ११ जणांचा संघ तयार करून टीम इंडिया चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 15, 2021 09:37 AM2021-01-15T09:37:56+5:302021-01-15T09:38:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test : A maiden Test wicket to cherish for Washington Sundar, Video | India vs Australia, 4th Test : अजिंक्य रहाणेनं रचलेल्या सापळ्यात स्टीव्ह स्मिथ अडकला, पाहा वॉशिंग्टन सुंदरची पहिली विकेट 

India vs Australia, 4th Test : अजिंक्य रहाणेनं रचलेल्या सापळ्यात स्टीव्ह स्मिथ अडकला, पाहा वॉशिंग्टन सुंदरची पहिली विकेट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देडेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस स्वस्तात बादस्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांची ७० धावांची भागीदारी

India vs Australia, 4th Test Day 1 : हाताशी असलेल्या खेळाडूंमधून अंतिम ११ जणांचा संघ तयार करून टीम इंडिया चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् टीम इंडियाच्या ताज्या दमाच्या गोलंदाजांचा कस लागेल ही चिंता सतावू लागली. पण, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला पहिल्या सत्रातच माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन या जोडीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सापळा रचून त्यालाही माघारी जाण्यास भाग पाडले.

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजाच्या तुलनेत सध्याच्या अंतिम ११मधील भारतीय गोलंदाज किती मागे आहेत हे आकडेवारीवरून समजेलच... ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११मधील गोलंदाजांच्या नावावर एकूण १०४६ विकेट्स आहेत, तर टीम इंडियाच्या प्लेईंग ११ने फक्त १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी दोन विकेट हा रोहित शर्माच्या नावावर आहेत. आजच्या सामन्यात टीम इंडियाकडून टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी पदार्पण केलं. सिराज व सैनी यांच्याकडेही १-२ कसोटींचा अनुभव आहे. अशा परिस्थितीतही टीम इंडियानं ऑसींना सुरुवातीलाच धक्के दिले. दोन कसोटीचा अनुभव असलेल्या सिराजनं पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नरला बाद केलं. ९व्या षटकात अजिंक्यनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू दिला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर मार्कस हॅरीलला माघारी पाठवलं.

स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ षटकं खेळून काढताना ७० धावांची भागीदारी केली. स्मिथसाठी हा दौरा फार खास राहिलेला नाही. सिडनी कसोटीत त्यानं १३१ व ८१ धावा चोपल्या. त्याव्यतिरिक्त त्याच्या धावांची पाटी ही १, १*, ०, ८ अशी राहिली आहे. आर अश्विनच्या जाळ्यात तो सहज अडकला. पण, आजच्या सामन्यात अश्विन नसल्यानं वॉशिंग्टन सुंदरवर ( Washington Sunder) ही जबाबदार होती. त्यालाही स्मिथ जुमानत नसल्याचे पाहून अजिंक्यनं सापळा रचला. त्यानं रोहितला शॉर्ट मिडविकेटवर उभं केलं आणि सुंदरनं डाव ओळखून स्मिथच्या पायात चेंडू टाकला. ही रणनीती यशस्वी ठरली आणि स्मिथ ( ३६) रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला.


पाहा व्हिडीओ...
 

Web Title: India vs Australia, 4th Test : A maiden Test wicket to cherish for Washington Sundar, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.